उस्मानाबाद जिल्ह्यात ४ फेब्रुवारी रोजी चोरीच्या चार घटना
शिराढोण : दाभा, ता. कळंब येथील ग्रामस्थ- पांडुरंग धोंडीराम टेळे व हिंगणगाव ग्रामस्थ- महादेव पांडुरंग तनपुरे या दोघांच्या घराच्या चॅनलगेटचे कुलुप अज्ञात व्यक्तीने दि. 02- 03.02.2022 रोजी दरम्यानच्या रात्री तोडून टेळे यांच्या घरातील 42 ग्रूम सुवर्ण दागिने, 24,800 ₹ रक्कम आणि तनपुरे यांच्या घरातील 12 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने व 40,000 ₹ रक्कम असा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या पांडुरंग टेळे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग : तुळजापूर तालुक्यातील किलज ग्रामस्थ- प्रसाद रंगनाथ मोजगे व राजेंद्र मर्डे, दत्तात्रय राजमाने यांच्या किराणा दुकानाच्या दरवाजाचे लोखंडी पट्टी दि. 03.02.2022 रोजी 01.00 ते 04.00 वा. दरम्यान अज्ञात व्यक्तीने तोडून दुकानातील रोख रक्कम व किराणा साहित्य असा 26,250 ₹ असा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या प्रसाद मोजगे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील विश्वनाथ तानवडे यांसह त्यांचे शेजारी- हनुमंत म्हमाणे या दोघांच्याही बंद घरांचे कुलूप दि. 02- 03.02.2022 रोजी दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने तोडून तानवडे यांच्या घरातील 132 ग्रॅम सुवर्ण दागिन्यांसह 60,000 ₹ रक्कम तर म्हमाणे यांच्या घरातील 12 ग्रॅम सुवर्ण दागिन्यांसह 20,000 ₹ रक्कम असा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या विश्वनाथ तानवडे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
लैंगिक अत्याचार
उस्मानाबाद : एक 35 वर्षीय महिला (नाव- गाव गोपनीय) दि. 19.01.2022 रोजी 12.00 वा. सु. आपल्या घरात असतांना पतीसह नात्यातील दोन पुरुष व दोन महिलांनी त्यांना मारहान करुन बांधून ठेवले. त्यानंतर त्या दोन पुरुषांनी त्या महिलेवर लैंगीक अत्याचार करुन घडल्या प्रकाराची वाच्यता केल्यास तीला ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या पिडीत महिलेने दि. 03.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376 (ड), 323, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.