उस्मानाबाद जिल्ह्यात ३ फेब्रुवारी रोजी चोरीच्या चार घटना 

 
Osmanabad police

नळदुर्ग  : अणदुर, ता. तुठजापूर येथील देविदास रामा घोडके यांच्या घराच्या दरवाजाला अज्ञात व्यक्तीने दि. 31.02.01.2022 ते 01.02.2022 दरम्यानच्या रात्री छिद्र पाडून दरवाजा उघडून घरातील कपाटातील 165 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने व 90,000 ₹ रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या देविदास घोडके यांनी दि. 01.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            दुसऱ्या घटनेत जळकोट, ता. तुळजापूर येथील अर्जुन शिवाजी कदम यांच्या शेत गट क्र. 737 मधील ऊसाच्या पिकात असलेल्या तुषार सिंचनाच्या 14 तोट्या दि. 31.01.2022 ते 01.02.2022 दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या अर्जुन कदम यांनी दि. 02.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

भूम  : उळुप, ता. भुम येथील गौतम महादेव वरळे हे दि. 01- 02.02.2022 दरम्यानच्या रात्री आपल्या घरात कुटूंबीयांसह झोपलेले असतांना त्यांच्या घराचा कडी- कोयंडा अज्ञात व्यक्तीने उचकटून घरातील 52,000 ₹ रक्कम व जुन्या वापरत्या साड्या चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या गौतम वरळे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 380, 457 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  : सोलापूर येथील विजय शिवाजी मिस्कर यांच्या ताब्यातील होंडा युनिकॉर्न मोटारसायकल क्र. एम.एच. 45 एएम 3150 ही दि. 29.01.2022 रोजी 18.30 वा. सु. उस्मानाबाद येथील छ. शिवाजी महाराज चौकातून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या विजय मिस्कर यांनी दि. 02.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web