उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीच्या चार घटना 

 
crime

तुळजापूर  : पुणे येथील- ज्योती दिपक साळुंके या दि. 17.10.2022 रोजी 11.00 वा. सु. तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदीरासमोरील महाद्वारासमोर असताना गर्दीचा फायदा घेउन अज्ञात व्यक्तीने त्यांच्या पर्समधील ॲपल आय फोन 13 प्रो. मोबाईल ज्योती यांच्या नकळ चोरुन नेला. अशा मजकुराच्या राजेश अशोक मगर (पुजारी), रा. तुळजापूर यांनी दि. 18.10.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 उस्मानाबाद  : उस्मानाबाद येथील- फिरोज हबीब काझी यांची अंदाजे 20,000 ₹ किंमतीची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एक्स 6551 ही दि. 08.10.2022 रोजी 12.30 ते 14.45 वा. दरम्यान उस्मानाबाद तहसिल कार्यालय परिसरातून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिरोज काझी यांनी दि. 18.10.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नळुदर्ग  : गवळी गल्ली, नळदुर्ग येथील- सुनिल माणिकराव गव्हाणे यांनी त्यांच्या घर आवारातील पाणी टाकीवर ठेवलेली अंदाजे 1,500 ₹ किंमतीची लक्ष्मी कंपनीची 1 अश्वशक्ती क्षमतेची विद्युत मोटार दि. 16.10.2022 रोजी 22.00 ते दि. 17.10.2022 रोजी 06.00 वा. दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या सुनिल गव्हाणे यांनी दि. 18.10.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            दुसऱ्या घटनेत नळदुर्ग रिसॉर्ट येथे पाणी महलजवळील मोकळ्या जागेतील 13 फुटी लोखंडी अँगल प्रत्येकी 1,000 ₹ किंमत असेले असे एकुण 20 अँगल दि. 16.10.2022 रोजी 19.00 ते. दि. 17.10.2022 रोजी 07.00 वा. दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या रिसॉर्ट येथील कर्मचारी- निखील ज्योतीबा येडगे, रा. नळदुर्ग यांनी दि. 18.10.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web