उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीच्या चार घटना 

 
crime

येरमाळा  : बेंगलोर येथील प्रविणकुमार तुळशीराम जबडे यांनी दि. 13 जून रोजी 03.45 वा. सु. येरमाळा येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वरील भारत पेट्रोलियम किरकोळ विक्री केंद्राजवळ आपले टॅम्पो ट्रॅव्हल्स क्र. ए.पी. 02 टीएच 4110 ही थांबवले असता एका मोटारसायकलवर आलेल्या तीन अनोळखी पुरुषांनी त्या ट्रॅव्हल्सवरील 2,16,000 ₹ किंमतीचे सुवर्ण दागिने असलेल्या तीन पिशव्या त्या तीघांनी चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या प्रविणकुमार जबडे यांनी दि. 16 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            दुसऱ्या घटनेत खामकरवाडी, ता. वाशी येथील नंदकुमार भारत जावळे यांचा टिप्पर क्र. एम.एच. 24 जे 8400 हा दि. 14- 15 जून रोजी दरम्यानच्या रात्री तेरखेडा येथील एचपी पेट्रोल पंप येथून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या नंदकुमार जावळे यांनी दि. 16 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  : सांजा, ता. उस्मानाबाद येथील प्रशांत नरसिंगराव कदम हे दि. 16 जून रोजी 13.30 वा. सु. उस्मानाबाद येथील जित मोबाईल दुरुस्ती दुकानात सहपत्नीक गेले होते. यावेळी त्यांच्या पाठीमागे उभा असलेल्या दोन अनोळखी स्त्रीयांनी गर्दीचा फायदा घेउन प्रशांत कदम यांच्या पत्नीच्या पर्समधील 5 ग्रॅम सुवर्ण मंगळसुत्र कदम यांच्या नकळत त्या दोघींनी चोरुन नेले. अशा मजकुराच्या प्रशांत कदम यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

बेंबळी  : बोरखेडा, ता. उस्मानाबाद येथील सचिन सुरेश ढोबळे यांची होंडा शाईन मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एएन 2506 ही दि. 11- 12 जून रोजी दरम्यानच्या रात्री त्यांच्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या सचिन ढोबळे यांनी दि. 16 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web