उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीच्या चार घटना

उस्मानाबाद : उस्मानाबाद येथील अभिलाषा महादेव नागटिळक या दि. 10 जून रोजी 21.55 वा. सु. उस्मानाबाद येथील डि-मार्ट येथे असताना बिलींग काउंटरच्या बाजूस एका रॅकवर त्यांनी आपला वनप्लस नॉर्ड स्मार्टफोन ठेवला असता अज्ञात व्यक्तीने तो चोरुन नेला. अशा मजकुराच्या अभिलाषा नागटिळक यांनी दि. 11 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
दुसऱ्या घटनेत येडशी, ता. उस्मानाबाद येथील सरफराज शफी पटेल यांची हिरो होंडा पॅशन प्लस मोटारसायकल क्र. एम.एच. 12 ईसी 6200 ही दि. 01 जून रोजी 14.00 ते 21.30 वा. दरम्यान उस्मानाबाद येथील बस स्थानकातून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या सरफराज पटेल यांनी दि. 11 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
येरमाळा : सुकटा, ता. भुम येथील कांत बळीराम रोहे हे दि. 10 जून रोजी 21.30 वा. सु. तेरखेडा- नांदगाव वाहनाने प्रवास करत होते. दरम्यान दोन अनोळखी पुरुषांनी रोहे यांचे वाहन थांबवून त्यांना मारहान करुन त्यांच्या सदऱ्याच्या खिशातील 3,300 ₹ रक्कम जबरीने काढून घेतले व वाहनाची काच फोडून आर्थिक नुकसान केले. अशा मजकुराच्या रोहे यांनी दि. 11 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 394, 427, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर : शुक्रवार पेठ, तुळजापूर येथील किरण शिवाजी आडेकर यांच्या तुळजापूर येथील ‘करुना इलेक्ट्रीकल्स & मशीनरी’ या दुकानाचे शटर अज्ञात व्यक्तीने दि. 11 जून रोजी 02.45 वा. सु. उचकटून आतील पाच किलो तांब्याची तार चोरण्याचा प्रयत्न करत असताना किरण यांच्या मुलाने पाहिले असता तो सामान टाकुन पळुन गेला. अशा मजकुराच्या किरण आडेकर यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380, 511 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.