उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीच्या चार घटना 

 
crime

शिराढोण   :  सौंदना (अंबा), ता. कळंब येथील मुरलीधर मुकींदा गाडेकर, वय 55 वर्षे व दत्तु लिंबाजी गिरी यांच्या घराचे कुलूप दि. 20.04.2022 रोजी 01.00 ते 03.00 वा. दरम्यान अज्ञात व्यक्तीने उचकटून गाडेकर यांच्या घरातील रोख रक्कम व गिरी यांच्या घरातील सोने- चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकुण 3,68,027 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या मुरलीधर गाडेकर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा  : हतरगा (नदी), ता. निलंगा येथील निळकंठ रावजी कुलकर्णी हे दि. 28.03.2022 रोजी 09.00 वा. सु. उमरगा ते नारंगवाडी असा एसटी बसने प्रवास करत होते. दरम्यान बसमधील गर्दीची संधी साधून अज्ञात व्यक्तीने कुलकर्णी यांच्या पिशवीतील 73,240 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या निळकंठ कुलकर्णी यांनी दि. 20 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            दुसऱ्या घटनेत पतंगे रोड, उमरगा येथील बिभीषन विलास मुळे यांच्या शिवपुरी रोड येथील हॉटेलचे शटर दि. 19.04.2022 रोजीच्या रात्री उचकटून आतील एक स्मार्टफोन तसेच शेजारी- समर्थ भगवान खताळ यांच्या घराच्या खिडकीचा गज वाकवून घरात प्रवेश करुन चार्जींगला लावलेला स्मार्टफोन चोरुन नेला अशा मजकुराच्या बिभीषन मुळे यांनी दि. 20 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग  : मानेवाडी शिवारातील बोरी धरणावरील चिवरी ग्रमास्थ- वैभव काशीनाथ कोरे यांच्यासह अन्य तीन शेतकऱ्यांचे एकुण 400 मीटर केबल दि. 19- 20.04.2022 रोजी दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या वैभव कोरे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web