उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीच्या चार घटना 

 
crime

येरमाळा  : रत्नापुर, ता. कळंब येथील बाळासाहेब शिवाजी जाधवर हे दि. 02.03.2022 रोजी 15.00 वा. सु. येरमाळा येथील साप्ताहीक बाजारात असतांना गर्दीचा फायदा घेउन अज्ञात व्यक्तीने त्यांच्या विजारीच्या खिशातील दोन स्मार्टफोन जाधवर यांच्या नकळत चोरुन नेले. अशा मजकुराच्या बाळासाहेब जाधवर यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

शिराढोण  : मंगरुळ, ता. कळंब येथील वैभव लालासाहेब शिंदे यांची हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एए 4870 ही दि. 21- 22.02.2022 रोजी दरम्यानच्या रात्री त्यांच्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या वैभव शिंदे यांनी दि. 02.03.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  : तांबरी विभाग, उस्मानाबाद येथील विभावरी श्रीकांत कुलकर्णी, वय 87 वर्षे या दि. 02.03.2022 रोजी 15.55 वा. सु. शहरातील सातपुते औषधालयासमोरील रस्त्याने पायी जात होत्या. यावेळी समोरुन एका मोटारसायकलवर आलेल्या दोन अनोळखी पुरुषांनी श्रीमती कुलकर्णी यांच्या गळ्यातील मंगळसुत्र हिसकावून घेउन गेले. अशा मजकुराच्या विभावरी कुलकर्णी यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम 392, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर  : काक्रंबा, ता. तुळजापूर येथील मयुर सुनिल बेडगे यांच्या कृषी उत्पन्न बाजार समिती, तुळजापूर येथील आडत दुकानाचा पत्रा दि. 01- 02.03.2022 रोजी दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने उचकटून दुकानातील 14 पोती सोयादाने चोरुन नेले. अशा मजकुराच्या मयुर बेडगे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web