उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीच्या चार घटना 

 
crime

येरमाळा  : कडकनाथवाडी, ता. वाशी येथील गजेंद्र केराप्पा पंचविसे हे दि. 26.02.2022 रोजी 16.30 वा. सु. तेरखेडा येथील साप्ताहीक बाजारात असतांना  गर्दीच्या फायदा घेउन अज्ञात व्यक्तीने त्यांच्या सदऱ्याच्या खिशातील विवो स्मार्टफोन चोरुन नेला. अशा मजकुराच्या गजेंद्र पंचविसे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी  : कोळेवाडी, ता. उस्मानाबाद येथील आण्णासाहेब विनायक माने यांच्या कोळेवाडी गट क्र. 213 मधील शेतातील पत्रा शेडचे कुलूप दि. 21- 22.02.2022 रोजी दरम्यानच्या रात्री गावातीलच संशयीत पुरुषाने तोडून आतील 3 शेळ्या चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या आण्णासाहेब माने यांनी दि. 26.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

दुसऱ्या घटनेत तेर, ता. उस्मानाबाद येथील ग्रामस्थ- बाबा नरहरी आबदारे यांची हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एएम 9634 ही दि. 24.02.2022 रोजी 15.00 वा. सु. गावातील त्यांच्या स्टेशनरी दुकानासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या बाबा आबदारे यांनी दि. 26.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  : उस्मानाबाद येथील असलम अज्जमैद्दिन यांची नादुरुस्त झालेली बजाज डिस्कव्हर मोटारसायकल क्र. 25 वाय 7592 ही दि. 19- 20.02.2022 रोजी दरम्यानच्या रात्री कुरणेनगर परिसरातून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या असलम शेख यांनी दि. 26.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web