उस्मानाबाद जिल्ह्यात चार ठिकाणी हाणामाऱ्या 

 
crime

कळंब  : कोठाळवाडी येथील रामराजे अर्जुन नव्हाट यांसह कुटूंबातील 3 व्यक्ती यांचा भाऊबंद- भिमराव रामभाउ नव्हाट यांसह कुटूंबातील 3 व्यक्ती यांच्याशी शेतजमीनीच्या वादावरुन दि. 16 मे रोजी 11.30 वा. सु. कोठाळवाडी येथे हाणामाऱ्या झाल्या. यात दोन्ही कुटूंबातील सदस्यांनी परस्परविरोधी कुटूंबातील सदस्यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या रामराजे व भिमराव यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.

 

लोहारा  : विनोद मोरे, रा. हिप्परगारवा, ता. लोहारा हे दि. 16 मे रोजी सकाळी 07.00 वा. आपल्या अंगणात होते. यावेळी भाऊबंद- लक्ष्मण व संभाजी मोरे या पिता- पुत्रांसह एकुण 8 पुरुषांनी विनोद यांना जुन्या वादातून शिवीगाळ करुन लोखंडी गज, काठीने मारहान केल्याने ते जखमी झाले. अशा मजकुराच्या विनोद यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 149, 326, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

नळदुर्ग : नळदुर्ग येथील अक्कलकोट रस्त्यालगतच्या बीके हॉल, रहिमनगरच्या पाठीमागील पत्रा शेडच्या बाजूस एक नवजात बालिका दि. 16 मे रोजी 06.45 वा. ग्रामस्थ- श्रीमती सकीना शहा यांना आढळली. कुण्या अज्ञात व्यक्तीने त्या बालिकेचा जन्म लपवण्याच्या, तीचा त्याग करण्याच्या उद्देशाने तीला बेवारस सोडले असल्याचा संशय असून या प्रकरणी भा.दं.सं. कलम- 317 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  : खेडेगावातील एका तरुणाने गावातीलच 13 वर्षीय मुलीस दि. 15 मे रोजी दुपारी आंबे खाण्याच्या बहान्याने शेतात नेउन तीचा विनयभंग केला. या प्रकरणी तीच्या आईने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 354 सह पोक्सो कायदा कलम- 8, 12 व ॲट्रॉसिटी कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web