उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे चार गुन्हे 

 
crime

उमरगा  : माडज (द.), ता. उमरगा येथील- विशाल कार्तीक सुर्यवंशी यांच्या गावातीलच किराणा दुकानाचे कुलूप अज्ञात व्यक्त्तीने दि. 25.09.2022 रोजी 22.00 वा. ते दि. 26.09.2022 रोजी 04.00 वा. दरम्यान तोडून दुकानातील निरमा पुडे, बिस्कीट पुडे, खाद्य तेल, पोहे, 10 कि.ग्रॅ. शेंगदाणे पॅराशुट तेलाचे 12 बॉटल असा एकुण 6,000 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या विशाल सुर्यवंशी यांनी दि. 26.09.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

येरमाळा  : दहीफळ शिवारातील महावितरणच्या 3200 फुट, 3459 एमएम लघुदाब विद्युत वाहीनीची तार अंदाजे 30,000 ₹ किंमतीची दि. 23.09.2022 रोजी 12.00 ते 01.00 वा. दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या महावितरणच्या हदीफळ शाखेचे कनिष्ठ अभियंता- विशाल हिवरडे यांनी दि. 26.09.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

परंडा  : वडणेर, ता. परंडा येथील- कानीफनाथ शंकर तांबीले व भारत जालींदर काशीद या दोघांत शेत बांधावरुन जुना वाद आहे. या वादातून भारत काशीद यांनी दि. 25.09.2022 रोजी 19.45 वा. सु. कानीफनाथ तांबीले यांच्या शेतातील कडब्याची गंजीला आग लावून त्यांचे अंदाजे 30,000 ₹ चे आर्थिक नुकसान केले. अशा मजकुराच्या कानीफनाथ तांबीले यांनी दि. 26.09.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 435 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

लोहारा  : कानेगाव, ता. लोहारा येथील- विवेकानंद विलास भारती यांची अंदाजे 20,000 ₹ किंमतीची हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एपी 6444 ही दि. 20.09.2022 रोजी 11.00 ते दि. 21.09.2022 रोजी 03.00 वा. सु. त्यांच्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या विवेकानंद भारती यांनी दि. 26.09.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web