उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे चार गुन्हे दाखल 

 
crime

वाशी  : अजिजपुरा, बिड येथील- शेख अन्सार शेख महम्मद  वय 53 वर्षे हे दि.25.01.2023 रोजी 23.00 वा.सु. उस्मानाबाद ते बिड जात असताना सरमकुंडी फाटा बसस्थानक येथे दरम्यान बिड येथील- राधिका काशिनाथ भोसले, दिपाली नागेश नन्नवरे या दोघींनी गर्दीचा फायदा घेउन अन्सार यांच्या इजारीच्या खिशातील रोख रक्कम अंदाजे 74,500 ₹ त्यांच्या नकळत चोरुन नेले. अशा मजकुराच्या अन्सार शेख यांनी दि.26.01.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
वाशी  : ईट, ता. भुम  येथील- अशोक रघूनाथ चव्हाण यांची अंदाजे 50,000 ₹ किंमतीची हिरो होन्डां स्प्लेंडर मोटारसायकल क्र. एम.एच.25 एम 9568 ही दि.21.01.2023 रोजी 13.00 ते 15.00 वा. दरम्यान ईट येथील आठवडी बाजारातील पार्किंग मधून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या अशोक चव्हाण यांनी दि. 26.01.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कळंब  : किसन लक्ष्मण यादव  रा. बहुला, ता. कळंब  यांच्या बहुला शिवारातील शेतातील अंदाजे 45,300 ₹ किंमतीचे साहित्य  बोअरवेल मधील लोखंडी 30 पाईप, पीव्हीसी पाईप एक, एक विद्युत पंप असा माल दि.24-25.01.2023 दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरून नेला. अशा मजकुराच्या किसन यादव यांनी दि. 26.01.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कळंब  : कळंब येथील- राम मनोहर पडेकर, हे दि.25.01.2023 रोजी 19.30 वा.सु. कळंब आय टी आय कॉलेजच्या समोर रोडवर दोन अनोळखी पुरूषांनी राम यांचा रस्ता आडवून इजारीच्या खिशातील पॉकेट मधून अंदाजे 2000 ₹ रोख रक्कम व दोन मोबाईल फोन असा एकुण 4,200 ₹ किंमतीचा माल जबरीने लुटून पसार झाले. अशा मजकुराच्या राम मनोहर पडेकर यांनी दि.26.01.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 392,34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web