उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे चार गुन्हे दाखल
नळदुर्ग : एम.एस.सी.बी. नळदुर्ग येथील जुने क्वॉर्टर रूम चे दरवाज्याचे कूलूप अज्ञात व्यक्तीने दि.17.12.2022 रोजी 20.00 ते दि.26.12.2022 रोजी 17.15 वा. दरम्यान तोडून आतमधील अंदाजे 95,600 ₹ किंमतीचे सुमारे 11 केव्ही कंडेक्टर तार 120 किलो, एल.टी.तार 80 किलो, ॲपीयर किटकेट मोठे 16 नग, ॲपीयर किटकेट लहान 20 नग असा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या प्रविण गायकवाड व्यवसाय-नौकरी यांनी दि.27.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम-457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापुर : हडको तुळजापुर येथील- अजिंक्य रमेशराव रेणके यांची अंदाजे 40,000 ₹ किंमतीची हिरो कंपनीची एच.एफ.डिलक्स मोटारसायकल क्र.एम.एच.25 एसी 7693 ही दि.23.12.2022 रोजी 12.30 ते सायंकाळी 07.00 वा. दरम्यान रेणके यांच्या घरासमोरून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या अजिंक्य रेणके यांनी दि.27.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
उस्मानाबाद : जांभरुण, ता. मंठा, जि. जालना येथील- अजय रमेश जाधव यांसह अन्य सात लोक हे दि. 27.12.2022 रोजी 03.00 वा. सु. आळणी शिवारातील जवळे (दु.) फाटा येथील रस्त्याने अरटीगा कार क्र. एम.एच. 20 सीएच 7550 ने प्रवास करत होते. यावेळी रस्त्यावर असलेला जॅक नमूद कारला अडकल्याने चालक- अजय जाधव यांनी कार थांबवली असता चार अनोळखी व्यक्तींनी अचानकपणे कारजवळ येउन कारमधील लोकांना दगड, काठीने मारहान करुन जखमी केले. तसेच चाकूचा धाक दाखवून कारमधील लोकांजवळील 24 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने, तीन मोबाईल फोन व 5,000 ₹ रोख रक्कम असा एकुण 82,000 ₹ चा माल लुटून पसार झाले. अशा मजकुराच्या अजय जाधव यांनी दि. 27.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 394, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी : लातुर येथील- नामदेव तुळशीराम भालेराव, वय 47 वर्षे हे दि. 27.12.2022 रोजी 01.30 वा. सु. तडवळा शिवारातील रस्त्याने ओमनी वाहन क्र. एम.एच. 48 ए 6871 ही चालवत जात होते. दरम्यान त्यांच्या वाहनाखाली अचानकपणे काहीतरी वस्तू अडकल्याने ते पाहण्यासाठी खाली उतरले. यावेळी अंधारात दबा धरुन बसलेल्या चार अनोळखी इसमांनी भालेराव यांना धाक दाखवून त्यांच्याजवळील अंदाजे 2,000 ₹ किंमतीचा सॅमसंग मोबाईल फोन जबरीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या नामदेव भालेराव यांनी दि. 27.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 394 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.