उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे चार गुन्हे दाखल 

 
crime

ढोकी  : तडवळा (कसबे), ता. उस्मानाबाद येथील- दत्तात्रय बाबुराव विभुते यांचे अंदाजे 4,10,000 ₹ किंमतीचे बोलेरो वाहन क्र. एम.एच. 24 जे 6115 हे दि. 09.11.2022 रोजी 01.00 ते 06.00 वा. दरम्यान विभुते यांच्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या दत्तात्रय विभुते यांनी दि. 10.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर  : वेताळनगर, तुळजापूर येथील- समाधान अविनाश रसाळ, वय 28 वर्षे हे दि. 09.11.2022 रोजी 18.45 वा. सु. तुळजापूर येथील जुने बस स्थानकाजवळ असताना ग्रामस्थ- विश्वजित अमृतराव, हर्ष सोंजी, सोनु कवडे व रोहन काळे या सर्वांनी समाधान यांच्या दुकानाची तोडफोन करुन त्यांच्या हातातील  100 ग्रॅम वजनाचो चांदीचे ब्रेसलेट जबरीने काढून घेउन गेले. अशा मजकुराच्या समाधान रसाळ यांनी दि. 10.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 392, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा  : त्रिकोळी, ता. उमरगा येथील- दयानंद ऋषीकेत बिराजदार यांच्या त्रिकोळी गट क्र. 9/1 मधील शेत विहिरीजवळील जैन कंपनीचे तुषारसिंचनचे 9 पाईप एकुण 10,800 ₹ किंमतीचे दि. 02.11.2022 रोजी 19.00 ते 03.11.2022 रोजी 06.00 वा. दरम्यान शेजारील गावच्या एका परिचिताने चोरुन नेले असल्याचा त्यांना संशय आहे. अशा मजकुराच्या दयानंद बिराजदार यांनी दि. 10.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

परंडा  : वाशिम येथील ऊसतोड मजूर परंडा तालुक्यातील भोंजा शिवारात पाल ठोकून असून दि. 06.11.2022 रोजी 01.00 ते 01.30 वा. दरम्यान त्यांच्या पालवरील रोशन रमेश राठोड यांसह त्यांच्या सहकाऱ्यांचे विवो, टेक्नो, रेडमी, ओप्पो कंपनीचे असे एकुण 04 मोबाईल फोन व एक चांदीचे जोडवे असा एकुण 34,500 ₹ चा माल राजेश माणिक चव्हाण, रा. वाशीम (ह.मु. डोमगाव शिवार) यांनी चोरुन नेला. अशा मजकुराच्या रोशन राठोड यांनी दि. 10.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web