उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे चार गुन्हे दाखल 

 
crime

मुरुम  : आष्टाकासार, ता. लोहारा येथील प्रकाश बंडोपंत पाटील यांना दि. 02 जून रोजी 08.30 वा. सु. त्यांच्या घरासमोर भाऊ- विकास बंडोपंत पाटील व भावजय- पुष्पा या दोघांनी विमा अनुदान व भागीण शेतातील पैश्याच्या देवाण घेवाणच्या कारणावरुन शिवीगाळ करुने लाथाबुक्क्यांनी, लाकडी खिळीने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या प्रकाश पाटील यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            दुसऱ्या घटनेत आष्टाकासार येथील गणेश पवार, विकास पवार, शाम पवार, शिवाजी पवार या सर्वांनी दि. 26 मे रोजी 14.00 वा. सु. आष्टाकासार, वसंतवाडी येथे लग्नात फेटे बांधण्याच्या कारणावरुन अचलेर येथील संजय पोमा पवार यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लाकडाने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या संजय पवार यांनी दि. 02 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तामलवाडी  : तुळजापूर तालूक्यातील काटी ग्रामस्थ- ऋषीकेश रत्नाकर देशमुख व शशिकांत चंद्रकांत देशमुख यांचा गावकरी- सत्यजीत व विश्वजीत मोहन शिंदे यांच्याशी शेत रस्त्याचा जुना वाद आहे. याच रागातून दि. 02 जून रोजी 08.30 वा. सु. काठी गावात नमूद दोन्ही कुटूंबीयांत वाद होउन परस्परविरोधी कुटूंबातील सदस्यांनी शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसचे विश्वजीत शिंदे यांनी ऋषीकेश देशमुख यांच्या हाताच्या पोठरीवर चावा घेउन त्यांना जखमी केले.

            यावरुन ऋषीकेश देशमुख यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत आणि सत्यजीत शिंदे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 341, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

                                                                                   

From around the web