उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे चार गुन्हे दाखल 

 
crime

उस्मानाबाद  :  कृष्णा शिवशंकर कोरे, वय 23 वर्षे हा बेपत्ता झाल्याने ढोकी पोलीस ठाण्यात बेपत्ता प्रकरण क्रमांक 31/2021 नोंदवण्यात आले होते. तर ढोकी –गडदेवदरी रस्त्यालगतच्या गवतात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळल्याने आनंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मयत क्रमांक 49/2021 नोंदवण्यात आले होते. या मृतदेहाची डी एन ए चाचणी केली असता तो मृतदेह  कृष्णा शिवशंकर कोरे याचा असल्याचे निष्पन्न झाले होते. कृष्णा यास ढोकी येथील  पेट्रोलीयम विक्री केंद्रा पासुन 18.11.2021 रोजी 21.30 वा अज्ञात दोन तरुणांनी वाहनात घेउन जाउन त्याचा खुन केला आहे. अशा मजकुराचे निवेदन या अकस्मात मृत्यु चौकशीत मयताचे पिता- शिवशंकर कोरे यांनी दिल्याने दिनांक 30 मार्च रोजी भादसं कलम 302, 201,34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

ढोकी  :  आळण, ता. परभणी येथील संजय नामदेव गायकवाड, वय 46 वर्षे  यांचा मृतदेह दिनांक 27 मार्च रोजी दुपारी तेर-ढोकी  रस्त्या बाजुच्या उसा लगत आढळल्याने अकस्मात मृत्यु क्रमांक 23/2022 नोदंविण्यात आला आहे. संजय यांचा अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी  खुन करुन त्यांचा मृतदेह त्या शेताजवळ टाकला आहे. अशा मजकुराचे निवेदन या अकस्मात मृत्यु चौकशीत मयताचा मुलगा आकाश गायकवाड  यांनी दिल्याने दिनांक 30 मार्च रोजी भादसं कलम 302, 201,34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

परंडा  :  देपग्रा ग्रामस्थ विश्वास अंकुर तांबे हे त्यांचे घरासमोर वटयावर बसले असता हिंमत तांबे व शामल तांबे तेथे येवुन म्हणाले की, तु समाईकातले पैसे का खाल्लेस या कारणा वरुन अंकुर यांना शिवीगाळ करुन गच्चीला धरुन डोक्यात काठीने मारहाण केली, अंकुर तांबे यांचा मुलगा सोडवण्या करीता आला असता त्यासही लाथा बुक्यांनी मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी देवुन शिवीगाळ केली. अशा मजकुराच्या अंकुर तांबे   यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.स कलम 324,504,506,34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर :  शिवप्रसाद कॉलनी तुळजापूर येथील रहिवासी असणारे बाळासाहेब दौलतराव ढवळे हे त्यांचे राहते घरी असता तुळजापूर येथील पांडुरंग बनसोडे, ज्ञानेश्वर बनसोडे, सचिन बनसोडे, अरुण कांबेळे व इतर तीन महिला यांनी बाळासाहेब यांच्या घराचा ताबा घेण्याच्या उद्येशाने घरात प्रवेश करुन घरातील सामानाची तोडफोड करुन नुकसान केले. कपटाचे लॉक तोडुन महत्वाचे कागदपत्र व रोख 90,000 /- रु व सुवर्ण दागिने दोन तोळे घेवुन गेले व बाळासाहेब यांचे पत्नीस डोक्यात बाटली मारुन जखमी केरुन जिवे मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या बाळासाहेब ढवळे यांनी दिले प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 143, 147, 149, 324,327, 427, 452, 504,506  अंतर्गत्‍ गुन्हा नोंदवला आहे.

From around the web