उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीच्या पाच घटना 

 
Osmanabad police

तामलवाडी  : गंजेवाडी, ता. तुळजापूर येथील विष्णु गणपत गंजे हे दि. 29.01.2022 रोजी 10.30 वा. सु. तामलवाडी गट क्र. 106 मधील शेतात असतांना भाऊबंद- राजेंद्र गंजे, पांडुरंग गंजे, लक्ष्मण गंजे, सुरेखा गंजे यांनी पर्वीच्या वादावरुन विष्णु गंजे यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहान करुन त्यांना जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या विष्णु गंजे यांनी दि. 31 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

येरमाळा  : बावी, ता. वाशी येथील बाळु उत्तरेश्वर कसपटे यांनी तुषार सिंचन संचाच्या कारणावरुन दि. 20.01.2022 रोजी 18.30 वा. सु. बावी शिवारात गावकरी- प्रकाश अंबादास कवडे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या प्रकाश कवडे यांनी दि. 31 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            दुसऱ्या घटनेत वाशी तालुक्यातील कडकनाथवाडी येथील सुब्राव उत्तरेश्वर धालवडे व रामचंद्र या दोघा पिता- पुत्रांनी शेत विहीरीतील पाणी वाटणीच्या कारणावरुन दि. 31.01.2022 रोजी 20.30 वा. सु. भाऊबंद- संजय विनायक धालगडे यांना त्यांच्या घरात घुसून शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान केली. तसेच शेतात आल्यास ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या संजय धालगडे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 452, 323, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

भूम : रामेश्वर, ता. भुम येथील नागरबाई अर्जुन उगलमोगले या शेतजमीन वारसांच्या नावे करत नसल्याच्या कारणावरुन मुलगा- अशोक उगलमोगले यांसह सुन- अनिता, नातु- अतुल व आकाश तसेच धनाजी दिलीप उगलमोगले या सर्वांनी दि. 28.01.2022 रोजी 02.00 वा. सु. गट क्र. 278 मधील शेतात नागरबाई यांना शिवीगाळ करुन दगडाने मारहान केली. तसेच ठार मारण्याची धमकी देउन नागरबाई यांच्या शेत विहीरीवरील विद्युत फलक फोडून नुकसान केले. अशा मजकुराच्या नागरबाई उगलमोगले यांनी दि. 31 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 324, 323, 427, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

लोहारा  : हिप्परगा (रवा), ता. लोहारा येथील सागर ज्ञानोबा राठोड यांनी पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन दि. 02.01.2022 रोजी 20.30 वा. सु. गावकरी- बाळु काशीबा राठोड यांना त्यांच्या घरासमोर शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहान करुन त्यांना जखमी केले. अशा मजकुराच्या बाळु राठोड यांनी दि. 31 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web