उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीच्या पाच घटना
कळंब : कळंब महसुल विभागाच्या पथकाने टिप्पर क्र. एम.एच. 20 सीटी 7666 हा ( 2 ब्रास मुरुम) अवैध खनीज वाहतुक करत असताना मिळुन आल्याने पथकाने तो टिप्पर त्यातील मुरुमसह हस्तगत करुन कळंब तहसील कार्यालयाच्या आवारात आणुन लावला होता. यानंतर महसुल विभागाच्या नोटीसला उत्तर न देता व दंडही न भरता कार्यालयाच्या पुर्वपरवानगीशिवाय त्या टिप्परचे चालक- मालक पंतु अरुण भांगे व बाळकृष्ण गंगाधर भवर, दोघे रा. कळंब यांनी तो टिप्पर दि. 20.09.2022 रोजी 20.30 ते 21.30 वा. दरम्यान तहसील कार्यालयाच्या आवारातून चोरुन नेला. यावरुन कळंब विभागाचे मंडळ अधिकारी- तुळशीराम दत्तात्रय मटके यांनी दि. 22.09.2022 रोजी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
लोहारा : होळी, ता. लोहारा येथील- सुशिल मनोहर गायकवाड, लक्ष्मण गणपती राठोड व एन.टी. राठोड हे तीघे दि. 22.09.2022 रोजी 08.00 ते 11.00 वा. दरम्यान होळी येथील स्वस्त धान्य दुकानातील गहु व तांदुळ हे पोत्यांत भरुन ते गहु- तांदुळ खुल्या बाजारात विक्रीसाठी बोलेरो पिकअप वाहन क्र. एम.एच. 24 एबी 8206 मधून घेउन जात असताना लोहारा महसुल विभागाच्या पथकास आढळले. यावरुन तहसिल कार्यालय, लोहारा चे नायब तहसिलदार- श्री. महादेव गोविंद जाधव यांनी दि. 22.09.2022 रोजी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द जिवनावश्यक वस्तु सेवा कायदा कलम- 3, 7 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
परंडा : दुधी, ता. परंडा येथील- नितीन माधव जाधव, वय- 37 वर्षे यांच्या परंडा येथील ‘ऋषीकेश मशिनरी स्टोअर्स’ या दुकानाच्या शटरचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 22.09.2022 रोजी 19.00 वा. ते दि. 23.09.2022 रोजी सकाळी 09.40 वा. दरम्यान तोडून दुकानातील तांबा धातुचे 900 मिटर केबल व अन्य 9 वेटोळे केबल, बेरींग नग- 51, फ्युज नग- 150, 1 अश्वश शक्ती क्षमतेचे विद्युत मोटार नग- 6, एलटी पट्टी किट नग- 100 व गल्ल्यातील 4,000 ₹ रोख रक्कम असा एकुण 3,48,660 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या नितीन जाधव यांनी आज दि. 23.09.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा : कसगी, ता. उमरगा येथील- मल्लीनाथ शिवलिंगप्पा मुलगे, वय 52 वर्षे हे आपले घर कुलूप बंद करुन दि. 19.09.2022 रोजी 19.00 वा. ते दि. 23.09.2022 रोजी 06.00 वा. दरम्यान बाहेरगावी गेले होते. दरम्यानच्या काळात त्यांच्या घराचा कडी- कोयंडा अज्ञात व्यक्तीने तोडून घरात प्रवेश करुन आतील 10 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने, 100 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने- वस्तू, पितळी घागर, पाच पिशव्या गहु, 50 कि.ग्रॅ. तुर दाळ, 20 कि.ग्रॅ. उडीद दाळ, 50 कि.ग्रॅ. हरभरा दाळ व 4,000 ₹ रोख रक्कम असा एकुण 38,500 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या मल्लीनाथ मुलगे यांनी आज दि. 23.09.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 454, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
कळंब : तांदूळवाडी, ता. कळंब येथील- कल्याणराव बाबूराव डिकले, वय 57 वर्षे यांच्या तांदुळवाडी गट क्र. 4 मधील शेतातून त्यांचा ट्रॅक्टर क्र. एम.एच. 25 एच 4380 हा त्याच्या पाठीमागील एसटीपी फवारणी यंत्रासह अंदाजे 1,50,000 ₹ किंमतीचा दि. 14.09.2022 रोजी 07.00 वा. ते दि. 15.09.2022 रोजी 10.00 वा. दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या कल्याणराव डिकले यांनी आज दि. 23.09.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.