उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीच्या पाच घटना 

 
crime

उस्मानाबाद  : बार्शी नाका, उस्मानाबाद येथील बापु जंगल तौर यांची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटारसायकल क्र. एम.एच. 25 सी 1612 ही दि. 09.04.2022 रोजीच्या रात्री उस्मानाबाद येथील निंबाळकर कॉम्प्लेक्स समोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या बापु तौर यांनी दि. 29 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा  : चिंचोली, ता. उमरगा येथील शिवाजी राम पांचाळ यांची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल क्र. एम.एच. 25 सी 1465 ही दि. 20.04.2022 रोजी 13.15 वा. सु. उमरगा बस स्थानक परिसरातून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या शिवाजी पांचाळ यांनी दि. 29 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  : आळणी फाटा येथील एन.के. किसान सेवा पेट्रोलियम किरकोळ विक्री केंद्र येथील भुमीगत टाकीतील 1,72,000 ₹ किंमतीचे 1,654 लि. डिझेल दि. 26.04.2022 रोजी 02.00 ते04.30 वा. दरम्यान अनोळखी दोन पुरुषांनी उपसुन चोरुन नेले. अशा मजकुराच्या पे. विक्री केंद्र चालक- बाळासाहेब महेपतराव हाजगुडे, वय 42 वर्षे यांनी दि. 29 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

शिराढोन : निपणी, ता. कळंब येथील दामोदर शामराव मेटे व अण्णासाहेब महादेव मेटे यांच्या शेत विहीरीतील अनुक्रमे ईन्को 5 अश्वशक्ती क्षमतेचा विद्युत पानबुडी पंप व टेक्समो 3 अश्वशक्ती क्षमतेचा विद्युत पानबुडी पंप अज्ञात व्यक्तीने दि. 18- 19.04.2022 रोजी दरम्यानच्या रात्री चोरुन नेला. अशा मजकुराच्या दामोदर मेटे यांनी दि. 29 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

परंडा  : चिंचपुर (ढगे), ता. भूम येथील धनंजय दसराव जाधव हे दि. 28.04.2022 रोजी 20.45 वा. सु. चिंचपुर फाट्याजवळील एका ढाब्याजवळ हिरो स्प्लेंडर मोटारसायकल क्र. एम.एच. 25 क्यु 1730 ही व तीला चांदीची अंगठी व स्मार्टफोन असलेली पिशी त्या मो.सा. ला अडकवून ढाब्यात गेले असता दरम्यानच्या काळात त्या पिशवीसह मो.सा. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या धनंजय जाधव यांनी दि. 29 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web