उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे पाच गुन्हे दाखल

तुळजापुर : पुष्पक नगर, नाशिक येथील- चारूशिला सुनिल गांगुर्डे, वय 44 वर्षे या दि.31.12.2022 रोजी 08.00 वा. सु. तुळजापुर येथील भक्त निवास 108 मधील खोलीचा दरवाजा पुढे करुन झोपलेल्या होत्या. दरम्यान अज्ञात व्यक्तीने दरवाजा उघडून चारूशिला यांच्या खिडकीत ठेवलेल्या पर्स मधील दोन मोबाईल फोन व 35,000 ₹ रोख रक्कम असा एकुण 55,000 ₹ चा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या चारूशिला गांगुर्डे यांनी दि.31.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
कळंब : चंद्रपुर येथील- बबलुसिंग रामासिंग हे दि. 27.12.2022 रोजी 19.00 वा. ते दि.28.12.2022 रोजी 05.00 वा. दरम्यान साई ट्रान्सपोर्ट अमरावती येथुन ट्रक क्र. एम.एम. 34 बीजी. 8636 यामध्ये 25 टन 60 किलो सोयाबीन घेउन बार्शी येथे जात होते. दरम्यान हासेगाव ता.कळब येथील सहेली हॉटेल येरमळा रोड येथे जेवणासाठी त्यांनी ट्रक थांबवला असता ट्रक मधील अंदाजे 55,000 ₹ किंमतीचे 11 क्विंटल सोयाबीन अज्ञात व्यक्तीने चोरून नेले. अशा मजकुराच्या बबलुसिंग रामासिंग यांनी दि.31.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापुर : नाझरे, ता.सांगोला येथील- अमर दादासाहेब चव्हाण यांची अंदाजे 32,000 ₹ किंमतीची हिरो स्प्लेडंर मोटारसायकल क्र.एम.एच.45ए एम. 9548 ही दि.25.09.2022 रोजी 20.00 ते 23.00 वा. दरम्यान तुळजापुर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या अमर चव्हाण यांनी दि.31.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
भुम : भुम येथील- अरूण मुरलीधर गवळी हे दि. 31.12.2022 रोजी 20.40 वा. सु. चिंचपुर (ढगे) शिवारातील बाणगंगा नदी पात्रातुन महिद्रा कंपनीचे सरपंच 575 ट्रॅक्टर क्र.एम.एच.25 ए.डी. 0420 ट्राली मधून सुमारे एक ब्रास वाळू अंदाजे 5,000 ₹ किंमतीची बेकायदेशीर रित्या चोरुन घेउन जात असतांना साडेसांगवी शिवारातील रस्त्यावर भुम पो.ठा.च्या पथकास आढळले. यावर पथकाने नमूद वाळूसह ट्रॅक्टर- ट्रॉली जप्त करुन भुम पो.ठा. चे पोलीस अंमलदार- कर्णराज राव यांनी दि.31.12.2022 रोजी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
येरमाळा : जामखेड, जि. अहमदनगर येथील- रोहित पवार, शाकीर शेख, आकाश चंदन, कुणाल पवार व इतर 5 ते 6 व्यक्ती यांनी चोराखळी शिवारातील महाकाली सांस्कृतिक कला केंद्रावर येउन तेथील राजाभाउ सिताराम माळी, रा. चोराखळी ता.कळंब यांसह मिनाबाई ससाणे, निशा चव्हाण, सायली वाघमारे या सर्वांना शिवीगाळ करून लोखंडी रॉडने, काठीने, मारहान केली. तर रोहित पवार व त्याच्या सोबतचे साथीदार यांनी नमूद लोकांच्या जवळील तीन मोबाईल फोनसह 37 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने असा एकुण 1,70,000 ₹ किंमतीचा माल जबरीने घेउन गेले. तसेच कला केंद्रावर दहशत निर्माण करून वाहनांची तोडफोड करून नुकसान केले. अशा मजकुराच्या राजाभाउ माळी यांनी दि.31.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 395, 397, 427, 504अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.