उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे पाच गुन्हे दाखल 

 
crime

शिराढोण :  कोथळा ग्रामस्थ- अच्युत भागवत शिंदे हे मद्यपी असल्याने मुलगा – सागर यांच्याशी त्यांचा वाद होत असे. याच वादातुन दि. 28 मार्च रोजी 18.30 वाजता शेतामध्ये सागर याने ठार मारण्याच्या उददेशाने पिता- अच्युत यांच्या डोक्यात दगडाणे टोले मारुन त्यांना गंभीर जखमी केल्याने ते मयत झाले. त्यानंतर खुनाचा पुरावा नष्ठ करण्याच्या उददेशाने सागर याने तो म`तदेह सुमारे 50 मीटर ओढत नेउन बैलगाडीत टाकुन ग्रामस्थ- रावसाहेब शिंदे यांच्या शेतातील विहीरीकडे नेत असताना मयताचे भाउ- अशोक भागवत शिंदे यांना दिसले.  अशा मजकुराच्या मयताचे भाउ- अशोक भागवत शिंदे  यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.स कलम 302, 201 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
उस्मानाबाद  :  खानापुर ग्रामस्थ- समाधान मगर व शरद गायकवाड या दोन्ही कुटुंबीयांत जुने वैमनस्य असुन याच वादातुन दि. 28 मार्च रोजी 17.00 वाजता गल्लीमध्ये दोन्ही कुटुंबीयांनी परस्पर विरोधी कुटुंबीयांस शिवीगाळ करुन व ठार मारण्याची धमकी देउन काठीने, दगडाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या परस्पर विरोधी 2 प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 324,504,506,34 अंतर्गत्‍ 2 गुन्हे नोंदवले आहेत.

 
नळदुर्ग  :  गंधोरा ग्रामस्थ- लक्ष्मण सुरवसे व अदिनाथ सुरवसे या दोन्ही कुटुंबीयांत जुने वैमनस्य असुन याच वादातुन दि. 28 मार्च रोजी 13.30 वाजता गल्लीमध्ये दोन्ही कुटुंबीयांनी परस्पर विरोधी कुटुंबीयांस शिवीगाळ करुन व ठार मारण्याची धमकी देउन काठीने, दगडाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या परस्पर विरोधी 2 प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 324,504,506,34 अंतर्गत्‍ 2 गुन्हे नोंदवले आहेत.

 
तुळजापुर  :  तुळजापुरातील धारीवाल वसाहतीत राहणा-या सुवर्णा लोखंडे या दि. 26 मार्च रोजी 9.30 वाजता आपल्या घरात होत्या. यावेळी त्याच वसाहतीतील कोमल घाटे यांनी सुवर्णा यांच्या घरात घुसुन उसन्या पैशांची  परतफेड करण्याचा तगादा लावला. यातुनच घाटे यांनी लोखंडे यांना शिवीगाळ करुन, लाथा बुक्याने मारहाण केली. कोमल यांच्या बचावास त्यांचे पती व मुलगी पुढे सरसावले असता त्यांनाही कोमल यांनी शिवीगाळ करुन, लाथा बुक्याने मारहाण करुन नमुद तीघांना ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या सुवर्णा लोखंडे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 341, 504, 506, 34 अंतर्गत्‍  गुन्हा नोंदवला आहे.

 
वाशी  : पारगाव ग्रामस्थ-  बाबासाहेब व अनिकेत हारे हे पिता- पुत्र दि. 5 मार्च रोजी 9.30 वाजता आपल्या घरात असताना ग्रामस्थ- जावेद, हमीद, शकील, अकील पठाण यांसह रवी काळे  यांनी बाबासाहेब यांच्या घरात घुसुन खडी वाहतुकीच्या वादातुन हारे पिता-पुत्रांना शिवीगाळ करुन, लाथा बुक्याने मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या बाबासाहेब हारे यांच्या दि. 29 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 452, 143, 147,149, 324, 504, 506 अंतर्गत्‍  गुन्हा नोंदवला आहे.

From around the web