रहदारीस धोकादायकरित्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हे दाखल

 
crime

उस्मानाबाद  : टोंक, राजस्थान येथील रहिवासी शिवराज गुजर यांनी  दि. 22 जून रोजी 21.30 वा. सु. उस्मानाबाद शहरातील एन.एच.52 या महामार्गावरील हॉटेल जमजम समोर आपल्या ताब्यातील वाहन रहदारीस धोकादायकरित्या उभे करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले.

 परंडा  : खासगाव, परंडा येथील लक्ष्मण भांगे व परंडा येथील मुन्ना शेख आणि नारायण गडदरे या तिघांनी दि.23 जुल रोजी 11.30 वा चे सुमारास परंडा ते बार्शी कडे जाणारे सार्वजनिक रोडवर  आपआपल्या ताब्यातील वाहन रहदारीस धोकादायकरित्या उभे करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले.

 शिराढोण  : बोरगाव, कळंब येथील रमेश जगधने यांनी दि. 23 जुन रोजी 18.10 वा चे सुमारास छ.शिवाजी महाराज चौकामध्ये तसेच कोथळा, कळंब येथील सुंदर ओव्हाळ व लोहाटा पश्चिम, कळंब येथील बाळासाहेब कदम यांनी  23.00 वा चे सुमारास लातुर ते कळंब कडे जाणा-या सार्वजनिक रोडवर  आपआपल्या ताब्यातील वाहन रहदारीस धोकादायकरित्या उभे करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले.

यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरध्द संबंधीत पोलीस ठाण्यात  स्वतंत्र गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

From around the web