धोकादायकरित्या वाहन उभा करणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल

 
crime

तामलवाडी  : निळोबा अरुण गायकवाड, रा. तामलवाडी यांनी दि. 21 मे राजी 13.39 वा. सु. तामलवाडी येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वर आपल्या ताब्यातील मोटारसायकल ही रहदारीस धोकादायकरित्या उभा करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

 रस्ता अपघात

बेंबळी  : डिकसळ, ता. कळंब येथील ज्ञानेश वसंतराव दिक्षीत, वय 45 वर्षे हे दि. 16 मे रोजी सकाळी 08.00 वा. सु. करजखेडा येथील रस्त्याने बलेनो कार क्र. एम.एच. 25 एएल 4254 ही चालवत जात होते. दरम्यान त्यांच्या कार समोर अचानक गाय आल्याने तीला वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांनी निष्काळजीपने कारचा ब्रेक दाबल्याने कार रस्त्याबाजूच्या शेतात जावून पलटली. या अपघातात ज्ञानेश हे गंभीर जखमी होउन मयत झाले तर कारमधील त्यांचे कुटूंबीय किरकोळ जखमी झाले. अशा मजकुराच्या शितल ज्ञानेश दिक्षीत यांनी दि. 21 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ),  337, 338 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web