महिलेवर लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल 

 
crime

उस्मानाबाद : एका 42 वर्षीय पुरुषाने गावातीलच 30 वर्षीय महिलेशी सन- 2017 ते मे 2022 या कालावधीत वेगवेगळ्या ठिकाणी वेळोवेळी लैंगीक अत्याचार केले. दरम्यान तीने त्यास नकार दिला असता त्याने तीला शिवीगाळ, मारहान करुन त्या महिलेच्या कुटूंबीयांस ठार मारण्याची  धमकी तीला दिली. अशा मजकुराच्या पिडीत महिलेने दि. 16 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376, 324, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपने अग्नी प्रज्वलीत करणाऱ्यांवर गुन्हे दाखल 

कळंब : अजहर यासीन पठाण व विशाल शामराव गाडे, दोघे रा. कळंब यांनी दि. 17 मे रोजी 17.50 ते 18.30 वा. दरम्यान कळंब येथे येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांचे जिवीतास धोका निर्माण होईल अशा स्थितीत आपापल्या हातगाड्यावरील गॅस शेगडीवर अग्नी प्रज्वलीत करुन पदार्थ तयार करत असताना कळंब पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 285 अंतर्गत 2 गुन्हे नोंदवले आहेत.

 लोकसेवकाच्या कर्तव्यात अडथळा करणाऱ्यावर गुन्हा दाखल

तुळजापूर : नगरपरिषद, तुळजापूर चे पथक दि. 17 मे रोजी 11.30 वा. सु. तुळजापूर शहरात अतिक्रमन हटवण्याची मोहीम राबवताना अजय दत्तात्रय कोकाटे यांचे बाकडे जप्त करुन वाहनात ठेवले होते. यावर कोकाटे यांनी अतिक्रमण कारवाईस विरोध करुन व आरडा-ओरड करुन ते बाकडे वाहनातून बाहेर काढून घेतले. तसेच पथकातील प्र. स्वच्छता निरीक्षक- दत्तात्रय साळुंखे यांची गचांडी धरुन व बुक्क्यांनी मारहान करुन त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. अशा प्रकारे साळुंखे यांच्या शासकीय कर्तव्यात कोकाटे यांनी जाणीवपुर्वक अडथळा केला. यावरुन दत्तात्रय साळुंखे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web