गोवंशीय प्राण्यांची अवैध वाहतुक करणा-यावर गुन्हा दाखल

 
crime

 परंडा  : परंडा पोलीस ठाण्याचे पथक दिनांक 08 मार्च रोजी गावातील वारदवाडी चौकात सकाळी 06.00 वा  कर्तव्यावर होते. यावेळी त्यांनी पिकअप वाहन क्रमांक एम एच 25 ए जे 2112 व एम एच 45 एच एफ 1655  ला अडवुन तपासणी केली असता त्या दोन्ही वाहनांतुन माढा-सोलापुर येथील चालक शहनवाज कुरेशी व अकीब काझी हे दोघे  11 जरशी गाईंसह एका बैलाची  दाटीवाटीने अवैध वाहतुक करत असल्याचे आढळले. यावरुन  सहा.पोलीस फौजदार भाउसाहेब जगताप यांनी  सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरे वरुन पशु क्रुरता अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

 रस्ता अपघात

उस्मानाबाद  : शाकीर खान रा.हरीयाणा राज्य हे दिनांक 18 फेब्रुवारी रोजी 23.00 वा वडगाव सिध्देश्वर शिवारात राष्ट्रीय महामार्ग  चालत ओलांडत होते यावेळी तेर येथील पांडुरंग कदम यांनी पॅशन मोटार सायकल क्रमांक एम एच 25 एस 4632 ही निष्काळजीपणे चालवल्याने खान यांना धडकली.या अपघातात खान हे गंभारी जखमी होवुन उपचारादरम्यान मयत झाले. या प्रकरणी रफिक भाई खान यांनी दिलेल्या प्रथम खबरे वरुन  भा.दं.सं. कलम- 304 अ ,279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web