येरमाळा अपघात प्रकरणी गुन्हा दाखल 

 
crime

येरमाळा  : एसटी महामंडळाचे चालक- आनंद रामचंद्र आदमाने, रा. उस्मानाबाद यांनी दि. 21.04.2022 रोजी 11.05 वा. सु. चोराखळी येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वर महामंडळाची टाटा सुमो क्र. एम.एच. 06 एडब्ल्यु 4301 ही निष्काळजीपने चालवल्याने रस्त्यावरील गायीला धडकून दुभाजकापलीकडे जाउन कार क्र. एम.एच. 12 पीएच 2503 ला समोरुन धडकली. 

या अपघातात कारमधील निर्मला सुरेश गोळे, वय 55 वर्षे, धिरज दत्तात्रय गोळे, वय 26 वर्षे व चंद्रकला सदाशीव गोळे, वय 70 वर्षे, तीघे रा. तेरखेडा, ता. वाशी हे मयत झाले. तर सुमो वाहनातील बाळासाहेब बाबाराव काळे, वय 45 वर्षे, रा. कारी हे वैद्यकीय उपचारादरम्यान मयत झाले. तसेच या अपघातात कारसह सुमोचे आर्थिक नुकसान झाले. अशा मजकुराच्या प्रमोद सुरेश गाळे, रा. तेरखेडा यांनी दि. 27 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 304(अ), 279, 337, 338, 427 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 निष्काळजीपने वाहन चालवणाऱ्यावर गुन्हा दाखल 

तुळजापूर : जवळगा (मे.), ता. तुळजापूर येथील विजय कांबळे यांनी दि. 27.04.2022 रोजी 11.00 वा. सु. नविन बस स्थानक, तुळजापूर समोरील सार्वजनिक रस्त्यावर टाटा मॅजीक वाहन क्र. एम.एच. 13 बीएन 3162 हा निष्काळजीपने भरधाव वेगात चालवून भा.दं.सं. कलम- 279 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द गुन्हा नोंदवला आहे.

From around the web