प्राण्यांची निर्दयतेने वाहतुक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

 
crime

येरमाळा  : कैलास हरीभाउ गवळी व अखिल खुर्शीद कुरेशी, दोघे रा. वाशी हे दि. 0503.2022 रोजी 17.00 वा. सु. येरमाळा येथील बार्शी रस्त्यावर मिनी ट्रक क्र. एम.एच. 04 जीसी 1368 मध्ये 7 जर्शा गायी दाटीवाटीने भरुन त्यांच्या चारापाण्याची कोणतीही व्यवस्था न करता निर्दयतेने तसेच अवैधरित्या वाहतुक करत असताना येरमाळा पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन येरमाळा पो.ठा. चे पोलीस अंमलदार- संतोष तिघाडे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद दोघांविरुध्द प्राण्यांना क्रुरतेने वागणुकीस प्रतिबंध कायदा कलम- 11 (1) (ए) (डी) (एच) आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम- 119 सह मो.वा.का. कलम- 83 / 177 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

रहदारीस धोकादायकरित्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा दाखल

मुरुम  : आनंदनगर, मुरुम येथील अमीन इनामदार यांनी दि. 06.03.2022 रोजी 10.20 वा. सु. बेळंब बस स्थानक येथील रस्त्यावर ऑटो रीक्षा क्र. एम.एच. 25 एम 1581 हा रहदारीस धोकादायकरित्या उभा करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

मारहाण 

शिराढोण  : रांजणी, ता. कळंब येथील ताहेर शब्बीर शेख यांसह त्यांच्या कुटूंबातील 3 व्यक्तींचा भाऊबंद- कलाम शब्बीर शेख यांसह त्यांच्या कुटूंबातील 2 व्यक्तींशी शेतातील पाईपलाईनच्या कारणावरुन दि. 05.03.2022 रोजी 10.00 वा. सु. राहत्या गल्लीत वाद झाला. या वादाचे पर्यावसान हानामारीत होउन नमूद दोन्ही कुटूंबीयांनी परस्परविरोधी गटातील सदस्यांस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गज, काठीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या ताहेर शेख व कलाम शेख यांनी दि. 06.03.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.

                                                                                               

 
 

From around the web