लोकसेवकाच्या कर्तव्यात अडथळा करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

 
crime

तुळजापूर  : वीज बील भरणा न करणाऱ्यांवर राज्य महावितरण विभागाचे अधिक्षक अभियंता- श्री. उत्क्रांत रंगनाथ धायगुडे हे पथकासह दि. 02 जून रोजी 13.15 वा. सु. तुळजापूर शहरात कारवाई करत होते. यावेळी जुने बस स्थानकाजवळील वीज बील थकीत असलेल्या तीन ग्राहकांची वीज जोडणी तोडत असताना त्या तीघांनी पथकासोबत वाद घालून मारहान केली. तसेच उत्कांत धायगुडे यांना भिंतीवर ढकलून पथकातील ज्ञानेश्वर मोरे यांस खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहान करुन ठार मारण्याची धमकी दिली. यावरुन उत्क्रांत धायगुडे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353, 332, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

रस्ता अपघात

तुळजापूर  : सारोळा, ता. बार्शी येथील कुबेर विठ्ठल कानगुडे, वय 42 वर्षे यांनी दि. 10 मे रोजी 12.30 वा. सु. कात्री- गौडगाव रस्त्यावरील पुलाजवळ मोटारसायकल निष्काळजीपने चालवल्याने ती घसरुन रस्त्याबाजूच्या खड्ड्यात जाउन पडली. या अपघातात कुबेर यांच्या डोक्याला गंभीर जखम होउन ते मयत झाले. अशा मजकुराच्या रेवण विठ्ठल कानगुडे, रा. सारोळा यांनी दि. 02 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मयत- कुबेर यांच्याविरुध्द भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web