लोकसेवकाच्या कर्तव्यात अडथळा करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

 
crime

तामलवाडी : राज्य परिवहनचे बार्शी आगारातील चालक- चंद्रकांत भगवान गरड हे वैराग- भांडेगाव एसटी बस क्र. एम.एच. 14 बीटी 0503 ही दि. 26 मे रोजी 20.15 वा. सु. ने प्रवासी घेउन जात होते. दरम्यान बस काटी लमणतांडा शिवारात आली असता ग्रामस्थ- शंकर सिताराम पवार व काशीनाथ दगडु चव्हाण या दोघांनी एका मोटारसायकलवर येउन मो.सा. बसला आडवी लावून मोटारसायकलीस हुलकावणी दिल्याच्या कारणावरुन चंद्रकांत गरड यांना शिवीगाळ करुन गचांडी धरुन त्यांना मारहान केली. तसचे परत या रस्त्याने बस घेउन आल्यास ठार मारण्याची धमकी दिली. यावरुन  चंद्रकांत गरड यांनी दि. 27 मे रोजी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353, 341, 332, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


अपहरण 

उस्मानाबाद  : एक 17 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) दि. 26 मे रोजी 13.00 वा. सु. आपल्या राहत्या गल्लीत असताना अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी तीचे अपहरन केले आहे. अशा मजकुराच्या अपहृत मुलीच्या आईने दि. 27 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web