केसरजवळगा येथे हाणामारी 

 
crime

मुरुम  : केसरजवळगा ग्रामस्थ  सुरेखा ईराण्णा पवार या दिनांक  1 एप्रिल रेाजी 19.00 वाजता आपल्या घरासमोर असतांना  भाउबंद सुभाष व रेखा पवार या  पती –पत्नीनी  पुर्वीच्या वादातुन सुरेखा यांना शिवीगाळ करुन, धमकी देउन त्यांच्या डाव्या हाताची बोटे मुरगाळली असता सुरेखा यांच्या एका बोटाचे हाड मोडले.  अशा मजकुराच्या सुरेखा यांनी  दि. 10 एप्रिल रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 34, 325, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

स्मार्ट फोनची चोरी 

आंबी  :  देउळगाव ता.परंडा येथील एम एस ई बी कंत्राटी कामगार प्रदीप गाढवे हे मित्र विजयसह दि. 09-10 एप्रील दरम्यानच्या रात्री डोंजा येथील एम एस ई बी कार्यालयासमोरच्या ओटयावर  झोपले होते. दरम्यान त्या दोघांच्या उशाखालील दोन स्मार्ट फोन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या प्रदीप गाढवे यांनी दिलेल्या प्रथम खबरे वरुन  भा.द.स कलम 379 अंतर्गत  गुन्हा नोंदवला आहे.

From around the web