बेंबळी , आंबी येथे दोन गटात हाणामारी 

 

बेंबळी  :  नांदुर्गा ग्रामस्थ संजय बाबुराव गाढवे हे दिनांक 11 मार्च रोजी 08.00 वा शेतात असतांना त्यांचा भाउ किसन व बाबुराव  हे मागील भाडंणाचा राग मनात धरुन आब्यांचे झाड का जाळलेस असे म्हणुन संजय यास टिकावाचे तुंब्याने डावे गालावर मारले तर संजय यांची पत्नी सोडवण्या करीता आली असता तीसही केसाला धरुन ढकलुन दिले. व संजय यास लाथा बुक्यांनी मारहाण केली. अशा मजकुराच्या संजय यांनी  दि. 11 एप्रिल रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 324, 504, 506,34 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

आंबी  : तित्रज ग्रामस्थ बलम नवनाथ भोसले हे दिनांक 10 मार्च रोजी 01.00 वा सु घरी असतांना गणेश काळे, सतिश काळे, सनि काळे, सुन्या काळे, सर्व रा.पारधी पिडी भुम यांनी बलम यास तुझे नावावरील शेत जमीन आमचे नावावर कर म्हणुन कोयत्याचे तुब्यांने मारहाण केली तर बलम यांची मुलीसही लाथा बुक्यांनी माहरहाण करुन दोघांनाही शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या बलम भोसले यांनी  दि. 11 एप्रिल रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 324, 504, 506,34 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

उस्मानाबाद बसस्थानकात चोरी 

उस्मानाबाद  :  मिरा विजयकुमार माळी रा.सुशिला नगर, उस्मानाबाद या त्यांची मुली सोबत वैराग जाणे करीता बस स्थानाकातील बस मध्ये चढत असतांना मिरा यांचे हातातील पर्सला हिसका बसल्याचे त्यांना जावणले त्यांनी तात्काळ पर्सची पाहणी केली असता पर्सची पाठीमागील कप्याची चैन उघडी दिसली पर्सची पाहणी केली असता पर्स मधील 7 ग्रॅम सुवर्ण दागिने हे अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या मिरा माळी यांनी दिलेल्या प्रथम खबरे वरुन  भा.द.स कलम 379 अंतर्गत  गुन्हा नोंदवला आहे.


रहदारीस धोका निर्माण करणा-यांवर गुन्हा दाखल 

बेंबळी :  बेंबळी  पोलीस दिनांक 11 एप्रील रोजी 12.50 वा बेंबळी ते लोहारा जाणारे रस्त्याने गस्त करत असतांना लोहारा येथील हबीब नजीम शेख हे महिंद्रा सुप्रो एम एच 10 डी जी 3174 ही रहदारीस धोका निर्माण होईल अशा रितीने रस्त्यावर लावलेली आढळले. यावरुन पोलीसांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.स कलम 283 अंतर्गत  गुन्हा नोंदवला आहे.

From around the web