उस्मानाबाद जिल्ह्यात चार ठिकाणी हाणामाऱ्या

 
crime

लोहारा : हिप्परगा (रवा), ता. लोहारा येथील मोरे कुटूंबातील विनोद, सुशांत, दत्ता, ओमकार, प्रतिक, बालाजी, सोमनाथ, रंजना, चंद्रकला यांनी जुन्या वादाच्या कारणावरुन दि. 16 मे रोजी 00.30 वा. सु. भाऊबंद- सुनिता राम मोरे यांसह लक्ष्मण, महेश हराळे, संभाजी मोरे यांना त्यांच्या घरासमोर शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, कोयता, सळई, काठीने मारहान करुन गंभीर जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या सुनिता मोरे यांनी दि. 18 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 324, 323, 336, 143, 147, 148, 149, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

येरमाळा  : शेलगांव (दि.), ता. कळंब येथील लिंबराज विठोबा दिवाणे हे आपल्या पत्नी व मजुरांसह दि. 18 मे रोजी 13.00 वा. सु. गट क्र. 03 मधील शेतातून जात होते. यावेळी भाऊबंद- शहाजी तानाजी दिवाणे, मनिषा दिवाणे या दोघांनी त्यांचा रस्ता अडवून त्यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान करुन शेतात न येण्याबाबत धमकावले. अशा मजकुराच्या लिंबराज दिवाणे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 341, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा : मुळज, ता. उमरगा येथील उध्दव आलगुडे व भाऊबंद- दत्तात्रय माधव आलगुडे यांच्यात भुखंडाच्या कारणावरुन दि. 18 मे रोजी 07.30 वा. सु. राहत्या गल्लीत भांडण चालू होते. यावेळी उध्दव यांची पत्नी- अरुणा यांनी पतीच्या बचावास गेल्या असता दत्तात्रय यांसह विजया, आदित्य, अजिंक्य यांनी अरुणा व उध्दव या दोघांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान केली तर दत्तात्रय यांनी अरुणा यांच्या उजव्या हाताच्या बोटास चावा घेउन त्यांना जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या अरुणा आलगुडे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

भूम  : जयवंतनगर, भुम येथील केशव भागवत नागरगोजे, सिताबाई मुंढे, बलभिम मुंढे, अरुण कुटे, अतुल मुंढे, राजेंद्र यांनी शेत जमीन मोजणी व मालकीच्या कारणावरुन दि. 15 मे रोजी 12.00 वा. सु. बिभीषण रामकृष्ण नागरगोजे यांना त्यांच्या शेतात व घरी शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गजाने डोक्यात, हातावर मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या बिभीषण नागरगोजे यांनी दि. 18 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 1479, 325, 326, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                   

From around the web