येणेगूरमध्ये दोन गटांत हाणामारी
मुरुम : येणेगूर, ता. उमरगा येथील काजल राजेंद्र गायकवाड या दि. 21.04.2022 रोजी 14.00 वा. सु. आपल्या घराकडे पायी जात होत्या. यावेळी गावकरी- मोना अब्दुल शेख, गुडीया शेख, बाबु शेख, नरगिस शेख यांनी पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन काजय यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, सत्तुराने पाठीवर, पायावर मारहान करुन गंभीर जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. यानंतर कालज या वैद्यकीय उपचाकामी इस्पीतळात असतांना नमूद लोकांनी त्यांच्या घरातील साहित्यांची तोडफोड करुन अंदाजे 35,000₹ चे नुकसान केले.
यानंतर येणेगुर येथील नरगिसबानु रशीद शेख या त्यांच्या मुली- सुमैया व जास्मीन यांसह दि. 21.04.2022 रोजी 15.00 वा. सु. गावातील आपल्या चहा- नाष्त्याच्या गाड्यावर व्यवसाय करत होते. यावेळी गावकरी- राजेंद्र गायकवाड, काजल गायकवाड यांसह मुरुम येथील प्रकाश देडे व त्यांची बहिण या चौघांनी तेथे जाउन मागील भांडणाच्या कारणावरुन नरगिरबानु यांसह त्यांच्या मुलीस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गजाने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली.
अशा मजकुराच्या काजल गायकवाड यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324,427, 323, 504, 506,34 अंतर्गत व नरगिसबानु शेख यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
बेंबळी : तोरंबा (टाकी), ता. उस्मानाबाद येथील जिवण श्रीहरी ढोणे व त्यांचा भाऊ हे दि. 19.04.2022 रोजी 21.00 वा. सु. आपल्या घरात होते. यावेळी गावकरी- नामदेव बाबुराव चव्हाण, मनिषा महादेव माने, कानेगाव येथील माने यांचा नातेवाईक व बाबुराव चव्हाण या चौघांनी शेतातील झालेल्या पुर्वीचा उकरुन काढून ढोणे यांच्या घरासमोर येउन शिवीगाळ करण्यास सुरवात केली. यावर ढोणे बंधूंनी त्याचा जाब विचारला असता त्यांनी ढोणे बंधूंना लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या जिवण ढोणे यांनी दि. 22 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
रस्ता अपघात
ढोकी : लातूर येथील अक्षय आनंदकुमार कोद्रे, वप 26 वर्षे हे दि. 03.04.2022 रोजी 00.40 वा. सु. ढोकी- तडवळा रस्त्याने कार क्र. एम.एच. 14 डीएफ 2382 ही चालवत जात होते. यावेळी ओम परदेशी, रा. ढोकी यांनी इंडिगो कार क्र. एम.एच. 24 डीएफ 9105 ही निष्काळजीपने चालवल्याने अक्षय यांच्या कारला समोरुन धडकली. या अपघातात अक्षय यांच्या डोक्यास मार लागल्याने ते जखमी होउन त्यांच्या कारचे आर्थिक नुकसान झाले. अशा मजकुराच्या अक्षय कोद्रे यांनी दि. 22 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 427 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.