रुईभर, पिंपळगाव  येथे दोन गटात हाणामारी 

 
crime

बेंबळी : रुईभर, ता. उस्मानाबाद येथील एकनाथ गणपत तांबे हे दि. 18 मे रोजी 22.00 वा. सु. गावातील जमदाडे यांच्या पानटपरीसमोर असताना मद्यधुंत अवस्थेत असलेल्या गावकरी- रवि साहेबराव जाधव यांनी बाटलीतील पाणी पिल्याच्या कारणावरुन एकनाथ यांना शिवीगाळ केली. यावर एकनाथ तांबे यांनी जाधव यांस त्यांची पाण्याची बाटली परत करुन गावातील बस थांब्याजवळील कट्यावर जाउन बसले असता रवि जाधव यांनी घरुन मिरची पुड व विळा आणून मीरची पुड एकनाथ यांच्या अंगावर फेकली. यावेळी एकनाथ यांनी पाठीमागे वळाले असता रवि यांनी विळ्याने केलेला वार एकनाथ यांच्या डोक्यात पाठीमागील बाजूने लागून ते जखमी झाले. अशा मजकुराच्या एकनाथ तांबे यांनी दि. 19 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
कळंब  : पिंपळगाव (डोळा), ता. कळंब येथील उर्मिला संतोष टेकाळे यांनी दि. 19 मे रोजी 11.00 वा. सु. आपल्या शेतातील घरासमोर आपला भुखंड सोडून बांधकाम करण्यास भाऊबंद- योगीराज हरिश्चंद्र टेकाळे यांना सांगीतले यावर चिडुन जाउन योगीराज टेकाळे यांसह नीता टेकाळे या दोघांनी उर्मिला यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की करुन काठीने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या उर्मिला टेकाळे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार 

उस्मानाबाद  : आई- वडील कामानिमीत्त बाहेर गावी असल्याने एक 16 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) तीच्या लहान भावासह राहत होती. याची संधी साधून शेजारील गावच्या एका तरुणाने दि. 24.03.2022 रोजी त्या मुलीच्या घरी जाउन तीच्या आई- वडीलांवर खोटी केस करुन तीच्या भावास ठार मारण्याची धमकी तीला देउन तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. अशा मजकुराच्या पिडीत मुलीने दि. 16 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376 सह पोक्सो कायदा कलम- 4, 6, 8, 12 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web