उमरगा तालुक्यात दोन ठिकाणी हाणामारी 

 
crime

उमरगा : नाईकचाकुर, ता. उमरगा येथील शुभम महाविर पवार, वय 21 वर्षे हे दि. 05.05.2022 रोजी 09.00 वा. सु. त्यांच्या शेतातील सामाईक रस्त्याने जात होते. यावेळी त्या रस्त्याने रहदारी करण्याच्या कारणावरुन भाऊबंद- बालाजी रघुनाथ पवार, काशीबाई पवार, निखील पवार, निलेश पवार यांनी शुभम पवार यांना अडवून शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या शुभम पवार यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 341, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            दुसऱ्या घटनेत कराळी, ता. उमरगा येथील किशोर दत्तात्रय जोगदंड हे मित्र- गोविंद प्रभाकर डोलारे यांसह दि. 02.05.2022 रोजी 13.30 वा. सु. गाव शिवारातील पाझर तलावावर गेले होते. यावेळी तेथे मासे मारी करत असलेले गावकरी- हणुमंत विष्णु वडदरे यांनी किशोर जोगदंड यांच्याकडे रिकामी प्लास्टीकची बादली मागीतली. यावर किशोर यांनी, “माझ्या मित्राला पाणी प्यायचे आहे, मी घरी जाउन पाणी आणुन तुम्हालाही प्यायला देता.” असे हणुमंत वडदरे यांना सांगीतले. यावर हणुमंत यांसह त्यांचा मुलगा- अजय यांनी चिडून जाउन किशोर यांना जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान केली व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या किशोर जोगदंड यांनी दि. 05 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 323, 504, 506, 34 सह ॲट्रॉसिटी कायदा कलम- 3 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

बेंबळी  : धारुर, ता. उस्मानाबाद येथील अमोल व प्रदिप बळीराम शिंदे या दोघा भावांनी दि. 04.05.2022 रोजी 23.30 वा. सु. राहत्या घरासमोर कौटुंबीक वादाच्या कारणावरुन मोठा भाऊ- प्रमोद शिंदे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहान करुन त्यांना जखमी केले. अशा मजकुराच्या प्रमोद शिंदे यांनी दि. 05 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web