उस्मानाबाद जिल्ह्यात दोन ठिकाणी हाणामारी 

 
crime

उमरगा  :  कुंभारपटटी येथील पार्वती रावण बनसोडे या  दिनांक 13 एप्रील रोजी 23.30 वा घरी असतांना सागर रावण बनसोडे याने बियर पिण्यासाठी पैसे मागितले, पार्वती यांनी पैसे नसल्याचे सांगितले त्यावर सागर याने पार्वती यांना शिवीगाळ करुन लाकडी काठीने डोक्यात मारुन जखमी कले.अशा मजकुराच्या पार्वती   यांनी दिनांक 14 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 324,504 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

आंबी : गोसावीवाडी येथील भास्क्र संभाजी भुजे हे दिनांक 14 एप्रील रोजी 15.00 वा महादेव मंदीर समोर असतांना ग्रामस्थ समाधान सरवदे व राजेश मोरे यांची आपसात  मागील भांडणाचे कारणा वरुन अपसात भांडण चालु असतांना  भास्क्र यांनी पत्नी मालन, मामाची सुन मिराबाई  या भांडण सोडवण्यास आल्या असता त्यांनाही समाधान, दैवशाला सरवदे, इंदुबाई , रक्मीणी, अंगद, विलास, ज्ञानदेव उपासे व महेश जाधव यांनी संगणमत करुन शिवीगाळ करुन लाथा बुक्यांनी मारहाण करुन दगड व काठीने मारुन जखमी केले.तर समाधन मारुती सरवदे यांनी दिलेल्या फिर्याद वरुन राजेश मोरे, भास्क्र, विठठल, मालन भुजे, मोतीराम मोरे, मिराबाई यांनी चाकुने ,लाथाबुयांनी मारहाण, शिवीगाळ केली व जिवे मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या परस्पर विरोधी  दोन स्वंतंत्र  प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 324,323, 504, 143, 147,148,149 अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले  आहेत.  

 
रस्ता अपघात 

 परंडा :  नळीवडगाव ग्रामसथ-मंगेश आत्माराम गायकवाड हे दिनांक 13 एप्रील रोजी 21.00 वा कुंभेजा पाटी जवळुन त्यांचेकडील पिकअप चालवत होते. ज्योतीराम रेवनाथ सपकाळ हे उसाने भरलेला विना नबंरचे  ट्रॅक्टरला दोन ट्रेलर जोडुन उस वाहुन नेत होते. नमुद ट्रॅक्टर भरधाव वेगात निष्काळजीपणे चालुवन मंगेश यांचे पीकअपला  पाठीमागुन जोराची धडक देवुन मंगेश यांना गंभीर जखमी करुन त्यांचे म़ृत्युस व श्रीकृष्ण झेंगरे यांना किरकोळ जखमी करण्यास कारणीभुत झाले.अशा मजकुराच्या अमोल लोकरे  यांनी दिनांक 14 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 279, 337,338,304 अ  व मो वा का कलम 134,184 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

.                                                                                   

From around the web