उस्मानाबाद जिल्ह्यात तीन ठिकाणी हाणामारी

 
crime

भुम : वारेवडगाव, ता. भुम येथील विनोद शेषेराव नलवडे व निर्मला नलवडे या पती- पत्नींनी दि. 26.04.2022 रोजी 22.00 वा. सु. राहत्या घरी शेतजमीन वाटणीच्या कारणावरुन भाऊबंद- मंगल शेषेराव नलवडे, वय 60 वर्षे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लाटण्याने मारहान केली. तसेच निर्मला यांनी मगंल यांना भिंतीवर ढकलुन दिल्याने मगंल यांचा दात पडून त्या जखमी झाल्या. अशा मजकुराच्या मंगल नलवडे यांनी दि. 27 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 325, 324, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी  : आरणी, ता. उस्मानाबाद येथील आडसुळे कुटूंबातील बळी, सुंदर, राजाभाउ, अविष्कार, रामराजे, सुरज, रोहीत, रामकिसन, धनराज, केवळी, उषा या सर्वांनी शेतीजमीनीच्या कारणावरुन दि. 25.04.2022 रोजी 16.30 वा. सु. भाऊबंद- नानासाहेब शंकर आडसुळे यांना त्यांच्या शेतात शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गज, खोऱ्या, काठीने मारहान करुन जखमी केले तसेच ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या नानासाहेब आडसुळे यांनी दि. 27 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 324, 323, 143, 146, 147, 148, 149, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

वाशी  : रुई, ता. वाशी येथील ऋषीकेश चांगदेव घुले यांनी दि. 17.04.2022 रोजी 14.00 वा. सु. राहत्या घरासमोर पिता- चांगदेव घुले यांस शेतजमीन व घराची वाटणीची मागणी केली असता चांगदेव यांनी ऋषीकेश यांस लोखंडी गजाने मारहान करुन ठार मारण्याची धमकी दिली. यात ऋषीकेश यांच्या गुडघ्याचे हाड मोडून ते गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या ऋषीकेश यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 325, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

.                                                                                   

From around the web