उस्मानाबाद जिल्ह्यात तीन ठिकाणी हाणामारी 

 
crime

येरमाळा  : चोराखळी, ता. कळंब येथील महानंदा शंकर डुकरे यांच्या शेतातून रस्ता करण्याच्या कारणावरून महानंदा यांस त्यांचे पती व दोन मुले यांना भाऊबंद- महादेव डुकरे, सुदर्शन डुकरे, खंडेराव डुकरे, संकेत डुकरे, संदीप डुकरे, गंगाबाई डुकरे, मधुकर डुकरे या र्स्वांनी दि. 18.04.2022 रोजी 07.00 वा. सु. चोराखळी शिवारात शिवीगाळ केली. तसेच लोखंडी सळई, दगड, काठीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या महानंदा डुकरे यांनी दि. 20 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            तर याच प्रकरणी महादेव गणपती डुकरे यांनी प्रथम खबर दिली की, दि. 18.04.2022 रोजी 06.30 वा. सु. ते कुटूंबीयांसह चोराखळी शिवारात असतांना भाऊबंद- लक्ष्मण शंकर डुकरे, राहुल डुकरे, शंकर डुकरे, महानंदा डुकरे यांनी शेतजमीन मालकीच्या कारणावरुन महादेव यांसह त्यांच्या कुटूंबीयांस शिवीगाळ करुन लोखंडी गज, दगडाने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. यावरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

शिराढोण : मंगरुळ, ता. कळंब येथील आकाश प्रकाश आडागळे, प्रकाश आडागळे, भारत आडागळे यांना दि. 20.04.2022 रोजी 17.00 वा. सु. मंगरुळ शिवारात आर्थिक व्यवहाराच्या कारणावरुन भाकरे कुटूंबातील सिध्दु, अर्जुन, दशरथ, परमेश्वर, बालु यांनी शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, कोयता, काठी, दगड यांनी मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या आकाश आडागळे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web