उस्मानाबाद जिल्ह्यात तीन ठिकाणी हाणामारी 

 
crime

बेंबळी  : बरमगाव येथील श्रीमती -मोक्षदा प्रल्हाद घोडके व भाउबंद श्रीमती- प्रतिभा सुरेंद्र घोडके यांच्या कुटुंबात पुर्वापार वाद असल्याने शेतात उकीरडयासाठी खडडा खेादण्याच्या वादातुन दि. 6 एप्रिल रोजी दोन्ही कुटुंबात पुन्हा वाद उदभवला. यावेळी देान्ही गटातील स्त्री-पुरुष सदस्यांनी परस्पर विरोधी गटातील सदस्यांस शिवीगाळ करुन काठी, लाथा-बुक्यांनी मारहाण केली. अशा मजकुराच्या दोन्ही गटांनी दि. 7 एप्रिल रोजी दिलेल्या परस्पर विरोधी दोन प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 143, 149, 324, 504, 506 अंतर्गत दोन गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

 

ढोकी  : हिंगळजवाडी ग्रामस्थ्‍ – श्रीमती सोजरबाई भोंगे या दि. 4 एप्रिल रेाजी सकाळी 08.30 वाजता आपल्या घरासमोर असताना गावकरी- हरी गायकवाड यांसह त्यांचे मुलगे- खंडु व अशोक यांसह आदेश खटींग, वर्षा भोंग, सुशिला गायकवाड यांनी किरकेाळ वादातुन गजाने मारहाण केली. यात सोजरबाई यांच्या डाव्या खांदयाचे हाड मोडले. अशा सोजरबाई यांच्या दि. 7 एप्रिल रोजीच्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 143, 149, 326, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

 

नळदुर्ग  : हंगरगा (नळ) ग्रामस्थ- लखन देडे, वय- 36 वर्ष यांनी दि. 7 एप्रिल रेाजी झाडाच्या फांदीस गळफास घेवुन आत्महत्या केली होती. गावकरी- पंडित क्षीरसागर, लोचना उकरंडे, तसेच तुगाव ग्रामस्थ- उषा पाटोळे यांनी लखन याचा अनेकदा शारीरिक- मानसिक छळ केल्याने कंटाळुन लखन याने आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या मयताची आई – जनाबाई यांनी दि. 7 एप्रिल रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 306, 34 अंतर्गत दोन गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

From around the web