उस्मानाबाद जिल्ह्यात सहा ठिकाणी हाणामारी 

 
crime

उमरगा  : आष्टा (ज.) येथील लखन शिवाजी शिंदे, परमेश्वर जाधव, महेश जाधव यांच्या सोबत मद्य पित बसल्याचा जाब तोरंबा, ता. लोहारा धनराज औरादे यांनी पिता- शिवाजी औरादे यांना दि. 20.04.2022 रोजी 20.00 वा. सु. आष्टा (ज.) शिवारात विचारला असता आष्टा (ज.) येथील नमूद तीघांनी धनराज औरादे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान केली. तसेच ब्लेडने धनराज यांच्या छातीवर वारकरुन त्यांना जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या धनराज औरादे यांनी दि. 21 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

शिराढोण : नागुलगाव, ता. कळंब येथील महेश वसंत भोरे हे दि. 21.04.2022 रोजी 11.00 वा. सु. त्यांच्यासह त्यांच्या चुलत्यांची गट क्र. 40 मधील 60 आर शेतजमीन नांगरण्यासाठी गेले होते. यावेळी भाऊबंद- प्रविण हिराचंद भोरे, भालचंद्र भोरे, हिराचंद भोरे या तीघांनी महेश यांसह त्यांचे चुलते- सुर्यकांत भोरे व चुलतभाऊ- हणुमंत याना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच महेश यांच्या उजव्या हातास चावा घेउन त्यांना जखमी केले. अशा मजकुराच्या महेश भोरे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

ढोकी : तेर, ता. उस्मानाबाद येथील विमल देविदास यादव, वय 71 वर्षे यांचा नातू व गावकरी- दामाजी दिगंबर पिंपळे यांचा मुलगा- सोहम यांच्यात दि. 15.04.2022 रोजी 19.00 वा. सु. तेर येथे भांडण तक्रारी चालू असतांना विमल यांनी दामाजी पिंपळे यांना त्यांच्या मुलास समजाउन सांगण्यास सांगीतले असता दामाजी यांसह धनाजी थोडसरे यांनी विमल यांसह त्यांच्या नातवास शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान केली. तसेच दामाजी यांनी विमल यांच्या उजव्या हाताच्या दंडावर काठी मारल्याने विमल यांच्या हाताचे हाड मोडून त्या गंभीर जखमी झाल्या. अशा मजकुराच्या विमल यादव यांनी दि. 21 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मुरुम : नेहरुनगर, मुरुम येथील बाबासाहेब सुरेश कठारे, वय 56 वर्षे यांचा बिअर बार असून गावकरी- गौरव विजयकुमार सुभेदार हे दि. 19.04.2022 रोजी 23.30 वा. सु. कठारे यांच्या घराचे दार ठोठाउन मद्याची मागणी केली. यावेळी बाबासाहेब कठारे यांनी बार बंद झाल्याचे झाल्याचे सांगताच त्यांनी आरडाओरड करुन कठारे यांना शिवीगाळ केली. यावर कठारे यांनी सुभेदार यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्यांना सुभेदार यांनी लाथाबुक्क्यांनी मारहान करुन ढकलून दिले. यावेळी बाबासाहेब यांच्या डोक्यास मार लागून ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना स्पर्श ईस्पितळ, सोलापूर येथे उपचारकामी दाखल केले आहे. अशा मजकुराच्या आकाश बाबासाहेब कठारे यांनी दि. 21 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम 326, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर : तुळजापूर येथील अमोल तुकाराम शिंदे यांचा तुळजाभवानी मंदीर परिसरात प्रसादाच्या साहित्याचे दुकान आहे. ते ग्राहकांस बोलावून प्रसाद साहित्य विक्री करत असल्याच्या कारणावरुन दि. 21.04.2022 रोजी 08.00 वा. सु. तुळजाभवानी मंदीराच्या महाद्वारासमोर गावकरी- नितीन शहाजी निकम व ओम निकम या दोघा पिता- पुत्रांनी अमोल शिंदे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गज, काठीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या अमोल शिंदे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 326, 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

वाशी  : लिंबा (ग.), ता. बीड येथील सुरज रमेश थोरात, ताई रमेश थोरात, सुजाता सुरज थोरात, धिरज रमेश थोरात, रमेश शिवाजी थोरात यांनी शेतात कामाला येत नसल्याच्या कारणावरुन दि. 20.04.2022 रोजी 06.30 वा. सु. मोटे वस्ती, पारगाव, ता. वाशी येथील ग्रामस्थ- छाया हिरामण गालफाडे व मिना दत्तात्रय थोरात यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान केली. तसेच छाया यांच्या उजव्या डोळ्याजवळ कोयत्याने वार करुन त्यांना जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या छाया गालफाडे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 143, 147, 148, 149, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

.                                                                                   

                                                         

From around the web