उस्मानाबाद जिल्ह्यात पाच ठिकाणी हाणामारी 

 
crime

भुम  : शाळु गल्ली, भुम येथील चेतन राजेंद्र शाळु हे दि. 03.03.2022 रोजी 18.30 वा. सु. गांधी चौक, भुम येथील आपल्या दुकानात होते. यावेळी ग्रामस्थ- गणेश उत्तम वेदपाठक यांनी तेथे जाउन जुन्या आर्थिक व्यवहाराच्या कारणावरुन चेतन यांच्या अंगावर ॲसिड फेकल्याने चेतन यांच्या पाठीवर, हातावर, तोंडावर ॲसिड पडून ते जखमी झाले. यावेळी तेथे उपस्थित असलेले अक्षय संजय घोडके व सुमित संतोष टकले यांच्याही अंगावर ॲसिड पडल्याने ते जखमी झाले. तसेच गणेश यांनी ॲसिड आणलेली बाटली चेतन यांच्या डाव्या पायाच्या पंजावर मारून त्यांना जखमी केले व नादाला लागल्यास ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या चेतन शाळु यांनी दि. 04.03.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 324, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

येरमाळा  : बांगरवाडी, ता. कळंब येथील महादेव बांगर, लहु बांगर, पद्मीन बांगर, शितल बांगर, तुकाराम बांगर या सर्वांनी दि. 04.03.2022 रोजी 10.30 वा. सु. राहत्या गल्लीत कौटुंबीक वादाच्या कारणावरुन गावकरी- आरती लहु बांगर यांसह त्यांची आई- पार्वती भांगे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान करुन मुका मार दिला. तसेच लहु बांगर यांनी आरती यांच्या डाव्या हातावर कुऱ्हाड मारुन त्यांना जखमी केले. अशा मजकुराच्या आरती बांगर यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद : कौडगाव लमाण तांडा, ता. उस्मानाबाद च्या ग्रामपंचायतचे सेवक- बाबासाहेब शिवाजी राठोड हे दि. 01.03.2022 रोजी 17.00 वा. सु. आपल्या घराकडे जात होते. दरम्यान  ग्रामस्थ- दत्तात्रय हरिदास राठोड, दयानंद तुकाराम चव्हाण, बिबीबाई दत्तात्रय राठोड यांनी घरकुल योजने आपली नावे न आल्याच्या कारणावरुन बाबासाहेब यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गजाने मारहान करुन बाबासाहेब यांच्या उजव्या पायाचे हाड मोडले. अशा मजकुराच्या बाबासाहेब राठोड यांनी शासकीय रुग्णालय, उस्मानाबाद येथे वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 325, 324, 341, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            दुसऱ्या घटनेत जानवळ, ता. चाकुर येथील सुमित अशोक डोंबे, वय 27 वर्षे हे दि. 02.03.2022 रोजी 19.30 वा. सु. येडशी येथील रस्त्याने अभिनव ट्रॅव्हल्सने प्रवास करत असतांना त्यांनी लघुशंकेसाठी चालकास ट्रॅव्हल्स थांबवण्यास सांगीतली. ट्रॅव्हल्स चालकाने ट्रॅव्हल्स उभा करण्यास वेळ लावून अन्य ठिकाणी थांबवली असता सुमित यांनी ट्रॅव्हल्स थांबवण्यास वेळ लावल्याचा जाब विचारला असता ट्रॅव्हल्सच्या दोन चालकासह व्यवस्थापकाने सुमित यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मानहान करुन जखमी केले. तसेच जास्त बोलल्यास येडशी घाटात सोडण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या सुमित डोंबे यांनी दि. 04.03.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अंबी  : अंबी ग्रामस्थ- रामलाल गन्नु यादव, पंचु यादव, तुळशीराम तिघे यांनी जुन्या वादाच्या कारणावरुन दि. 02.03.2022 रोजी 16.00 वा. सु. देवगांव येथील मुसळे ईट भट्टी येथील मजूर- माणिक शेळवणे यांसह त्यांचा मुलगा-गोरख यांना ईट भट्टी येथे शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी फावडे, काठीने मारहान करुन जखमी केले तसेच ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या गोरख माणिक शेळवणे यांनी दि. 04.03.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  : उस्मानाबाद येथील राजु भागाजीराव मस्के, वय 54 वर्षे हे दि. 17.02.2022 रोजी 22.00 वा. सु. उस्मानाबाद शहरातील शेरखाने पेट्रोलियम विक्री केंद्रावर सीएनजी भरण्यासाठी कार क्र. एम.एच. 25 एएस 7050 ही रांगेत उभा करुन थांबले होते. यावेळी त्यांच्या कारसमोरील कार क्र. एम.एच. 12 एफके 4835 ही चालकाने निष्काळजीपने पाठीमागे घेतल्याने मस्के यांच्या कारला धडकून कारचे आर्थिक नुकसान झाले. यावर मस्के यांनी त्या समोरील कार चालकास जाब विचारला असता त्या कार चालकासह अन्य दोन अनोळखी पुरुषांनी मस्के यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या राजु मस्के यांनी दि. 04.03.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 504, 506, 323, 427, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                               

From around the web