उस्मानाबाद जिल्ह्यात आठ ठिकाणी हाणामारी 

 
crime

उमरगा  : कदमापुर, ता. उमरगा येथील अशोक मंमाळे, शिवाजी शंकर भोसले, दिपक यंम्पाळे यांचा दाळिंब, ता. उमरगा येथील फिरोज बागवान, जाफर बागवान यांच्याशी वाहनास बाजू न दिल्याच्या व हॉर्न वाजवल्याच्या कारणावरुन दि. 13 जून रोजी जेकेकुर चौरस्ता येथी लातूर रस्त्यावर आपापसात हाणामाऱ्या झाल्या. यात कदमापुर येथील नमूद तीघांनी दाळींब येथील नमूद दोघांना ठार मारण्याच्या उद्देशाने कत्ती, हंटर, हॉकी स्टीकने मारहान करुन गंभीर जखमी केले. तर दाळींब येथील नमूद दोघांनी कदमापुर येथील नमूद तीघांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहान करुन ठार मारण्याची धमकी दिली.

            अशा मजकुराच्या जाफर बागवान यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307, 324, 323, 504, 506, 34 तर अशोक मंमाळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            दुसऱ्या घटनेत कराळी तांडा येथील प्रदिप चव्हाण, तुळशीराम चव्हाण, सतीश चव्हाण, प्रविण चव्हाण, देविदास चव्हाण, विजय राठोड यांसह मुळज तांडा येथील लुल्या राठोड या सर्वांनी अर्थिक व्यवहाराच्या कारणावरुन दि. 12 जून रोजी 22.00 वा. सु. कल्याणी तांडा, कोळसुर येथील गेमा भुजा पवार यांना त्यांच्या घरासमोर शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगड, काठीने मारहान करुन त्यांना जखमी केले. अशा मजकुराच्या गेमा पवार यांनी दि. 14 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 143, 147, 148, 149 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

शिराढोन : पिंपरी, ता. कळंब येथील सोनवणे कुटूंबातील गौतम व राजाभाऊ केरबा सोनवणे, तेजस व उज्वल राजाभाऊ सोनवणे, शिवानंद सोनवणे हे सर्व दि. 12 जून रोजी 08.00 वा. सु. गावकरी- श्रध्दा गाडे यांचे बांधकामावरील भिंत पाडत होते. यावेळी श्रध्दा गाडे यांनी नमूद लोकांना त्याचा जाब विचारला असता त्यांनी श्रध्दा यांना शिवीगाळ करुन लोखंडी गज, दगड, विटेने मारहान करुन गंभीर जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या श्रध्दा गाडे यांनी दि. 14 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 324, 143, 147, 148, 149, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  : तांबरी विभाग, उस्मानाबाद येथील रामचंद्र बळीराम क्षिरसागर यांनी भिमनगर येथील आकाश गायकवाड व त्यांची आई अशा दोघांना दि. 13 जून रोजी 04.00 वा. सु. गुजर गल्ली, उस्मानाबाद येथे आपल्या ऑटो रीक्षाने सोडून रीक्षाचे भाडे मागीतले. यावर आकाश गायकवाड यांनी चिडून जाउन, “मी सुध्दा रिक्षावाला आहे. तु मला पैसे का मागीतले.” या कारणावरुन आकाश यांनी रामचंद्र यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान केल्याने रामचंद्र यांचे दोन दात पडून ते गंभीर जखमी झाले. तसेच रामचंद्र यांच्या रीक्षाची समोरील काच फोडून नुकसान केले. अशा मजकुराच्या रामचंद्र क्षिरसागर यांनी दि. 14 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 325, 324, 427, 504, 323 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

भूम  : शेतजमीनीच्या कारणावरुन इंदिरानगर, भूम येथील रामदास रामदास सोमनाथ लष्कर यांसह त्यांची मुले- लहु व अंकुश या तीघांनी दि. 14 जून रोजी 08.00 वा. सु. भूम येथील दुध संकलन केंद्रासमोर भाऊबंद- प्रदिप मेघराज लष्कर यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच प्रदिप यांना लोखंडी गजाने, हेल्मेटने व दगडाने मारहान करुन त्यांना जखमी केले. अशा मजकुराच्या प्रदिप लष्कर यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- े324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद : शेतजमीनीच्या जुन्या वादाच्या कारणावरुन येडशी येथील निसार पटेल, जाफर पटेल, सारा पटेल, फैजीया पटेल यांसह पळसप येथील सलाम पटेल, कमाल पटेल या सर्वांनी दि. 13 जून रोजी 18.00 वा. सु. येडशी येथील अब्दुल पटेल यांसह त्यांच्या कुटूंबीयांस गावातील त्यांच्या बेकरीसमोर शिवीगाळ करुन लोखंडी गज, काठी, गॅस पाईप, लोखंडी पंपाने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या अब्दुल पटेल यांनी दि. 14 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 143, 147, 148, 149 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तामलवाडी : सावरगाव, ता. तुळजापूर येथील निलेश तानवडे हे दि. 14 जून रोजी 17.00 वा. सु. आपल्या शेतातून घरी जात असताना गाकवरी- माणिक डोके व महादेव डोके यांनी रस्त्यात टाकलेल्या काटड्याचा जाब निलेश यांनी विचारला असता नमूद दोघांनी निलेश यांना शिवीगाळ करुन चाबकाने मारहान केली. यावेळी निलेश यांच्या बचावास आलेल्या त्यांच्या आई- वडीलांसही नमूद दोघांनी लाकडी दांड्याने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या निलेश तानवडे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            दुसऱ्या घटनेत गोंधळवाडी, ता. तुळजापूर येथील व्यंकट लक्ष्मण रेड्डी हे दि. 14 जून रोजी 08.30 वा. सु. कोरेवाडी शिवारातील आपले शत एक्सकॅव्हेटर यंत्राने नीटनेटके करत होते. यावेळी भाऊबंद- बालाजी व तानाजी केशव रेड्डी या दोघांनी तेथे जाउन शेतजमीन मालकी हक्काच्या कारणावरुन व्यंकट रेड्डी यांना शिवीगाळ करुन दगड डोक्यात मारुन, काठीने मारहान करुन त्यांना जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या व्यंकट रेड्डी यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web