वाघोली, मातोळा येथे हाणामारी 

 
crime

उस्मानाबाद : वाघोली, ता. उस्मानाबाद येथील नाना कसबे, हनुमंत कसबे, तानाजी कसबे, खंडू कसबे यांचे गावातील- उमेश कसबे यांच्याशी दि. 14 मे रोजी 22.00 वा. सु. भांडण चालू होते. यावेळी ग्रामस्थ- परमेश्वर कसबे यांनी ते भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. यावर नाना, हनुमंत, तानाजी, खंडू यांनी परमेश्वर कसबे यांना शिवीगाळ करुन लोखंडी गजाने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या परमेश्वर कसबे यांनी दि. 15 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा  : विहीरीतील दगड- माती बांधावर टाकण्याच्या वादातून मातोळा (बोरी), ता. उमरगा येथील हिरालाल, लहु, अंकुश, शाम, गंगाराम फत्तेपुरे यांनी भाऊबंद- अमर फत्तेपुरे यांना दि. 15 मे रोजी 10.00 वा. त्यांच्या घरासमोर शिवीगाळ करुन काठीने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या अमर फत्तेपुरे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम-  324, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  : एका फेसबुक खात्यावर दि. 13 मे रोजी 22.00 वा. एका व्यक्तीवर अभद्र शैलीत टिका करण्यात आली होती. ही टिका त्या व्यक्तीची बदनामी करण्याच्या उद्देशाने  व दोन राजकीय पक्षांमध्ये वैमनस्य निर्माण निर्माण करण्याच्या उद्देशाने जाणिवपुर्वक करण्यात आली आहे. अशा मजकुराच्या रोहीत बागल, रा. उस्मानाबाद यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 153 (अ), 500, 501, 502 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                   

From around the web