तुळजापूर, मलकापूर येथे हाणामारी 

 
crime

येरमाळा  : मलकापुर, ता. कळंब येथील पांडुरंग काकडे, सोन्या काकडे, मोन्या काकडे या तीघांनी शेतातील पाणी वाटणीच्या कारणावरुन दि. 27.02.2022 रोजी 13.00 वा. सु. भाऊबंद- श्रीमंत प्रभु काकडे यांना त्यांच्या शेतात शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या श्रीमंत काकडे यांनी दि. 28.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर  : तुळजापूर येथील चंदाराणी कदम व पंकज छत्रे या दोघांनी दि. 27.02.2022 रोजी 18.00 वा. सु. हडको, तुळजापूर येथील सुभाष काशीनाथ छत्रे यांच्या घरात घुसून सुभाष छत्रे हे राहत असलेल्या घराच्या मालकीच्या कारणावरुन नमूद दोघांनी सुभाष यांसह त्यांच्या सुनेस शिवीगाळ करुन धक्काबुक्की करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या सुभाष छत्रे यांनी दि. 28.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 452, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


दोन तलवारी, तीन गुप्त्या बाळगणारे दोघे अटकेत

अंबी : मुगाव शिवारातील पुलाजवळ दोन पुरुष अवैधरित्या तलवारी व गुप्त्या ही शस्त्रे बाळगुन असल्याची गोपनीय खबर अंबी पो.ठा. च्या सपोनि- श्री. आषिश खांडेकर यांसह पथकास दि. 28.02.2022 रोजी 18.55 वा. सु. मिळाली. यावर पथकाने लागलीच नमूद ठिकाणी धाव घेतली असता तेथे चिखलवाडी, गुरुद्वारा गेट क्र.1, नांदेड येथील जयदीपसिंग गर्जनसिंग बरगुजरा व जितेंद्रसिंग गर्जनसिंग बरगुजरा हे दोघे आल्या ताब्यात दोन तलवारी व तीन गुप्त्या ही शस्त्रे अवैधरित्या बाळगुन विक्री करण्याच्या उद्देशाने तेथे थांबलेले असल्याचे मिळुन आले. यावर पथकाने नमूद शस्त्र व एका मोटारसायकलसह त्या दोघांना ताब्यात घेउन अंबी पो.ठा. चे पोलीस अंमलदार- गजानन मुळे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद दोघांविरुध्द अंबी पो.ठा. येथे गुन्हा क्र. 16 / 2022 हा भा.दं.सं. कलम- 34 व शस्त्र अधिनियम कलम- 4, 25 अंतर्गत नोंदवण्यात आला आहे.

From around the web