सोनारी आणि कलदेव लिंबाळा येथे हाणामारी 

 
crime

अंबी  : सोनारी, ता. परंडा येथील अमोल विश्वनाथ ईटकर व संताराम दिगंबर ईटकर या दोन्ही कुटूंबातील जुना वाद  दि. 27 मे रोजी 14.30 वा. उफाळून आला. यात दोन्ही कुटूंबातील सदस्यांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठून परस्पर विरोधी प्रथम खबर नोंदवल्याने पोलीस गुन्हे दाखल करत होते. यावेळी अमोल ईटकर यांनी आत्महत्या करण्याच्या उद्देशाने खिशातील टॅक्टीक हे गोचीड मारण्याचे औषध 17.22 वा. सु. पोलीस ठाण्याच्या प्रवेश द्वारासमोर पिण्याचा प्रयत्न करताच पोलीसांनी प्रसंगावधान राखून त्यांस अडवले. अशा प्रकारे त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याने अंबी पो.ठा. चे पोहेकॉ- अभिमान डुकळे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 309 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

मुरुम  : कलदेव लिंबाळा, ता. उमरगा येथील नागनाथ विश्वनाथ मुदगडे यांनी दि. 26 मे रोजी 21.00 वा. सु. आपल्या राहत्या घरी सुन- रेणुका शिवाजी मुदगडे यांना कौंटूंबीक वादाच्या कारणावरुन शिवीगाळ करुन ठार मारण्याच्या उद्देशाने रेणुका यांच्या डोक्यात, हातावर मारली. यात रेणुका यांच्या डोक्यास जखम होउन उजव्या हाताचे हाड मोडून त्या गंभीर जखमी झाल्या. अशा मजकुराच्या रेणुका मुदगडे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 307, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                   

                                                                  

From around the web