शिराढोण, उमरगा येथे हाणामारी 

 
crime

शिराढोण   : भाटशिरपूरा, ता. कळंब येथील इक्बाल युसूफ सय्यद, वय 19 वर्षे हे दि. 09 मे रोजी 21.00 वा. गावात होते. यावेळी जुन्या वादातून गावकरी- उत्रेश्वर बापुराव झोंबाडे याने इक्बाल यांस पकडले आणि आपला इक्बाल यांस ठार मारण्यास आपला सहकारी मित्र- कैलास महादेव लोंढे यास चिथावणी दिली. यावर कैलास याने इक्बाल यांच्या पोटात व छातीत चाकू खुपसून पिरगळल्याने इक्बाल गंभीर जखमी होउन मयत झाला. अशा मजकुराच्या अमीर पैगंबर सय्यद यांनी दि. 10 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 34, 109, 302, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा  : थोरलेवाडी, ता. उमरगा येथील भाग्यश्री वसंत कोराळे यांनी दि. 09 मे रोजी 13.00 वा. सु. त्यांच्या घराच्या अंगणातील कडबा खात असलेली दैवता व्हनाळे, नवनाथ व्हनाळे, शांताबाई व्हनाळे यांची जनावरे भाग्यश्री यांनी हाकालली. यावर व्हनाळे कुटूंबातील नमूद तीघांनी भाग्यश्री यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गज, दगडाने मारहान करुन त्यांना जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली.

याच प्रकरणी थोरलेवाडी येथील वसंत कोराळे व भाग्यश्री या दोघा पती- पत्नींनी दि. 09 मे रोजी 13.30 वा. सु. थोरलेवाडी येथे गावकरी- दैवता व्हनाळे यांसह त्यांचे पती- नवनाथ व्हनाळे यांना शिवीगाळ करुन दगड, काठीने मारहान करुन जखमी केले.अशा मजकुराच्या भाग्यश्री कोराळे व दैवता व्हनाळे यांनी दि. 10 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत स्वतंत्र दोन गुन्हे नोंदवले आहेत.

From around the web