कानेगाव, भूम, धानोरा येथे हाणामारी 

 
crime

लोहारा  : कानेगाव, ता. लोहारा येथील महेश विलास एकुरके यांसह अन्य तीन पुरुषांनी दि. 04.05.2022 रोजी 14.00 वा. सु. गावातील सार्वजनिक कुपनलिकेवर पाणी भरण्याच्या कारणावरुन गावकरी- रघुनाथ कृष्णा माने, वय 72 वर्षे यांना जातीवाचक शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. तसेच पाणी भरण्यास सार्वजनिक कुपनलिकेवर परत आल्यास रघुनाथ यांचे हातपाय तोडून टाकण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या रघुनाथ माने यांनी दि. 04 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 323, 504, 506, 188, 34 सह ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

भूम   : भुम येथील रामभाउ श्रीधर गाढवे, वय 30 वर्षे हे दि. 02.05.2022 रोजी 20.10 वा. सु. गोलाई चौक, भुम येथील रस्त्याने मोटारसायकल चालवत जात होते. यावेळी गावकरी- विशाल हरीश्चंद्र पवार, स्वप्नील हावळे यांसह एक अनोळखी पुरुष अशा तीघांनी एका मोटारसायकलवर पाठीमागून येउन पुवीच्या वादातून रामभाउ यांच्या पाठीत कोयत्याने मारुन त्यांना जखमी केले. तसेच शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या रामभाउ गाढवे यांनी दि. 04 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 504, 506, 34 सह शस्त्र कायदा कलम- 4, 25 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा  : धानोरा (द.), ता. उमरगा येथील राम, लक्ष्मण, शाम रमेश व्हनपाके व पंढरी राम व्हनपाके या सर्वांनी दि. 04.05.2022 रोजी 17.00 वा. सु. धानोरा (द.) शेत शिवारात जुन्या भांडणाच्या कारणावरुन भाऊबंद- मारुती गुणवंत व्हनपाके, वय 52 वर्षे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या मारुती व्हनपाके यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web