हंगरगा (नळ) तांडा , खडकी येथे हाणामारी 

 
crime

नळदुर्ग  : हंगरगा (नळ) तांडा, ता. तुळजापूर येथील मनिषा राजु चव्हाण या कुटूंबासह दि. 23 मे रोजी 23.30 वा. सु. घरासमोरील अंगणात झालेले होते. यावेळी गावकरी- विनायक राठोड, व्यंकट चव्हाण, सांकाबाई चव्हाण, सुरताबाई चव्हाण, शोभा राठोड, बंडु चव्हाण यांनी तेथे जाउन पुर्वीच्या वादावरुन मनिषा यांसह त्यांच्या आईस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान करुन मुका मार दिला. ठार मारण्याची धमकी देउन घराच्या दरवाजावर दगड फेकून मारुन नुकसान केले. अशा मजकुराच्या मनिषा चव्हाण यांनी दि. 25 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 427, 143, 147, 149 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कळंब  : खडकी, ता. कळंब येथील निलेश रमेश हिरे हे दि. 24 मे रोजी 17.30 वा. सु. कळंब येथील द्वारकानगरी येथे पिग्मी गोळा करत असतांना कळंब ग्रामस्थ- अजय शंकर कदम यांनी मोटारसायकलवर तेथे येउन निलेश यांना धडक दिली. यावर निलेश यांनी अजय यांस जाब विचारला असता अजय यांनी मी कळंबचा डॉन असल्याचे सांगून निलेश यांच्या डोक्यात लोखंडी गज मारुन त्यांना जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या निलेश हिरे यांनी दि. 25 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web