हिवर्डा, नागुर , वाशी येथे हाणामारी 

 
crime

भूम : हिवर्डा, ता. भुम येथील शहाजी शंकर मुंडे, वय 56 वर्षे हे आपल्या मुलासह दि. 13.05.2022 रोजी 12.30 वा. सु. न्यायालयातील सुनावनीस हजर राहून गांधी चौक, भुम येथून जात होते. यावेळी सोनगीरी, ता. भुम येथील बाबासाहेब कुटे व ऋषीकेश या दोघा पिता- पुत्रांसह सुरेखा मुंडे यांनी शहाजी मुंडे यांसह त्यांच्या मुलास न्यायालयात हजर राहिल्याच्या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, धारदार शस्त्राने व दगडाने मारहान करुन त्यांना जखमी केले. अशा मजकुराच्या शहाजी मुंडे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

लोहारा  : नागुर, ता. लोहारा येथील तानाजी शहाजी पाटील, वय 45 वर्षे हे दि. 06 मे रोजी 02.00 वा. सु. आपल्या घरात झोपलेले असताना गावकरी- बाबा खंडू शिंदे यांसह एक अनोळखी पुरुषाने चोरी करण्याच्या उद्देशाने पाटील यांच्या घराची कडी उचकटून आत प्रवेश केला. यावेळी पाटील हे जागी झाल्याने नमूद दोघांनी पाटील यांना मारहान करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या तानाजी पाटील यांनी दि. 13 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 458, 380, 511, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

वाशी : वाशी येथील श्रीकृष्ण लहु कवडे (नगरसेवक) हे दि. 10 मे रोजी 18.30 वा. सु. गावातील अहिरंत सोया विक्री केंद्रामध्ये असतांना गावकरी- रामा तायप्पा चव्हाण यांसह त्यांची मुले- माऊली व आकाश यांसह अन्य चार अनोळखी पुरुष यांनी तेथे जाउन आपल्या घराजवळील सार्वजनिक नळ जोडणी बंद केल्याच्या रागातून रामा यांनी कवडे यांच्या गळ्यास कोयता लाउन कवडे यांना लाथ मारुन खाली पाडले. तसेच इतरांनी शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गजाने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या श्रीकृष्ण कवडे यांनी दि. 13 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 327, 324, 323, 504, 506, 452, 143, 147, 148, 149 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                   

From around the web