क्रेडीट कार्डवरील क्रमांक सांगणे पडले महागात , ८९ हजाराला गंडा 

 
Osmanabad police

उस्मानाबाद  : उस्मानाबाद येथील रामलिंग सुग्रिव नाझरीकर यांना दि. 07.01.2022 रोजी 16.37 वा. सु. एका अनोळखी भ्रमणध्वनी क्रमांकावरुन कॉल आला. त्या कॉलवरील महिलेने, “तुमचे क्रेडीट कार्ड चालू करायचे असून त्यासाठी तुमच्या क्रेडीट कार्डवरील क्रमांक सांगा.” असे सांगीतले असता रामलिंग नाझरीकर यांनी काही एक सारासार विचार न करता विचारलेली सर्व माहिती त्या समोरील महिलेस सांगीतली. 

यावर नाझरीकर यांनी त्यांच्या भ्रमणध्वनीवर प्राप्त लघु संदेशातील ओटीपही त्या कॉलवरील महिलेस सांगीतला. यावेळी क्रेडीट कार्डवरुन 88,878 ₹ रक्कम कपात झाल्याबाबतचा बँकेचा लघु संदेश नाझरीकर यांना प्राप्त होताच आपली फसवणूक झाल्याचे त्यांना समजले. अशा मजकुराच्या रामलिंग नाझरीकर यांनी दि. 19.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
अपहरण 

उस्मानाबाद  : जिल्ह्यातील एका गावातील एक 19 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) दि. 17.02.2022 रोजी 21.00 ते 21.30 वा. दरम्यान कुटूंबीयास घरात न दिसल्याने कुटूंबीयांनी परिसरात तसेच नातेवाईकांकडे तीचा शोध घेतला असता गावातीलच एका तरुणाने अज्ञात कारणासाठी तीचे अपहरन केले अससल्याचे त्यांना समजले. यावरुन अपहृत मुलीच्या पित्याने दि. 19.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन संबंधीत तरुणाविरुध्द भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web