एकंबी तांडा : ट्रकची मोटारसायकलला धडक , एक ठार
लोहारा : एकंबी तांडा, ता. औसा, जि. लातूर येथील श्रीकांत खेरु राठोड यांनी दि. 26.02.2022 रोजी 20.30 वा. सु. जेवळी (उ.) येथील रस्त्यावर ट्रक क्र. एम.एच. 25 यु 0650 हा निष्काळजीपने चालवल्याने समोरुन येणाऱ्या मोटारसायकल क्र. एम.एच. 12 जेपी 1050 हिस धडकला. या अपघातात मो.सा. चालक- म्हळाप्पा हणमंत घोडके, वय 45 वर्षे, रा. जेवळी (उ.), ता. लोहारा हे गंभीर जखमी होउन मयत झाले. या अपघातानंतर नमूद ट्रक चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या मयताची पत्नी- अनिता म्हळाप्पा घोडके यांनी दि. 04.03.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
रहदारीस धोकादायकरित्या वाहन उभे करणाऱ्या सहा चालकांवर गुन्हे“ दाखल
उस्मानाबाद : सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरित्या वाहन उभे करणाऱ्या 6 चालकांवर उस्मानाबाद पोलीसांनी काल दि. 03.03.2022 रोजी कारवाया केल्या. यात राम केकडे, अजित राठोड, व्यंकट चव्हाण या तीघांनी उमरगा येथील सार्वजनिक रस्त्यावर तर अजगर मासुलदार, बालाजी शिंदे, गंगाधर तुगावे या तीघांनी उमरगा येथील सार्वजनिक रस्त्यावर आपापल्या ताब्यातील ऑटो रीक्षा रहदारीस धोकादायकरित्या उभा करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द संबंधीत पो.ठा. येथे स्वतंत्र 6 गुन्हे नोंदवले आहेत.